आई-वडिल घराबाहेर पडताच यावल शहरातील प्रौढाने घेतला गळफास

An adult committed suicide by hanging himself in Yawal city यावल : शहरातील संभाजी पेठ भागातील 45 वर्षीय इसमाने गळफास घेत आत्महत्या केली. या प्रकरणी यावल पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. राजेंद्र वसंतराव इंगळे (45, संभाजी पेठ, यावल) असे मयताचे नाव आहे.

आत्महत्येचे कारण अस्पष्ट
इंगळे हे आपल्या वृध्द आईसोबत वास्तव्यास होते व गुरूवारी वृध्द आई समर्थांच्या बैठकीला गेल्यानंतर त्यांनी सायंकाळी गळफास घेत आत्महत्या केली. हा प्रकार निदर्शनास येताच पोलिसांना माहिती देण्यात आली. मृतदेह यावल ग्र्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी हलवण्यात आला.

घटस्फोटीत प्रौढाची आत्महत्या
मयत इसमाचा चार वर्षांपूर्वी घटस्फोट झाला होता व तो पूर्वी भुसावळ येथील एका रेडिमेडच्या दुकानात कामाला होता तर सध्या मिळेल ते काम करून आपला उदरनिर्वाह करत होता. इंगळे यांनी आत्महत्या का केली कळू शकले नाही. या प्रकरणी भरत शंकरराव इंगळे यांनी दिलेल्या खबरीवरून यावल पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास पोलिस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार विजय पाचपोळ करीत आहे.