देविदास पवार ; दे.ना.भोळे महाविद्यालयात व्याख्यान
भुसावळ- भुसावळ- मोबाईल हा जीवनाचा अविभाज्य घटक बनला असला तरी त्याचा केवळ सकारात्मक कामासाठी वापर करावा मात्र हल्ली मोबाईलच्या अधिक वापरामुळे तरुण पिढी दिशाहीन होत चालली आहे. विद्यार्थ्यांनी आपला वेळ पुस्तक वाचनात व स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासासाठी खर्ची घातल्यास त्यांना जीवनात यश मिळेल व आई-वडील, शिक्षक यांच्यासारखे दुसरे मार्गदर्शक कुणीही नाही, असे विचार बाजारपेठ पोलिस निरीक्षक देविदास पवार यांनी येथे व्यक्त केले. दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयात विद्यार्थी कल्याण विभाग युवती सभा अंतर्गत विद्यार्थिनी व्यक्तिमत्त्व विकास कार्यशाळेच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते.
यांची प्रमुख उपस्थिती
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.पी.फालक होते. प्रमुख पाहुणे म्हणून स्त्री रोग तज्ज्ञ डॉ.शीतल चौधरी, युवती सभा प्रमुख प्रा.डॉ.शोभा चौधरी, विद्यार्थी कल्याण अधिकारी प्रा.डॉ.जगदीश चव्हाण व्यासपीठावर उपस्थित होते. प्रसंगी डॉ.शीतल चौधरी यांनी मुलींनी सकस आहार घ्यावा, तसेच नास्ता भरपेट करावा त्यात दूध, बदाम, खजूर, फळे, यांचा समावेश असला पाहिजे, असे सांगून संतुलित आहार घेतल्याने शरीराची कार्यक्षमत वाढते, अस सांगितले तर प्राचार्य डॉ.आर.पी.फालक यांनी विद्यार्थीनीनी सर्वांगीण विकासासाठी नियमित अभ्यास, योग, व्यायाम, खेळ, सांस्कृतिक कार्यक्रम, विविध उपक्रम सहभागी होणे गरजेचे असल्याचे सांगितले त्यामुळे आपला आत्मविश्वास व निर्णय क्षमता वाढते, असेही ते म्हणाले. सूत्रसंचालन प्रा.श्रेया चौधरी, प्रा.संगीता धर्माधिकारी तर आभार प्रा.अंजली पाटील यांनी मानले.
यांनी घेतले परीश्रम
कार्यक्रम यशस्वितेसाठी प्रा.डॉ.भारती बेंडाळे, प्रा.श्रेया चौधरी, प्रा.अंजली पाटील, प्रा.डॉ.संजय चौधरी, प्रा.अनिल सावळे, प्रा.डॉ.जगदीश चव्हाण, प्रा.डॉ.दयाधन राणे, प्रा.राजेंद्र भोळे, प्रा.डॉ.आर.बी.ढाके, प्रा.डॉ.जी.पी.वाघूळदे, प्रा.निर्मला वानखेडे, प्रा.एस.डी.चौधरी, प्रा.माधुरी पाटील, प्रा.डॉ.आर.एम.सरोदे, प्रा.अनिल नेमाडे, प्रा.एस.एस.पाटील, प्रा.रोहित तुरकेले, प्रा.गिरीश सरोदे, प्राध्यापक वृंद तसेच सुधाकर चौधरी, प्रकाश चौधरी, प्रकाश सावळे, सुनील ठोसर, दीपक महाजन, शिक्षकेतर कर्मचार्यांनी परीश्रम घेतल्याचे प्रसिद्धी प्रमुख प्रा.डॉ.संजय चौधरी कळवतात.