आकर्षक शिल्पात रुपांतर होणे म्हणजेच व्यक्तिमत्व विकास

0

शिरपूर । स र्वसामान्य व्यक्तीचे सुरेख व आकर्षक शिल्पात रुपांतर होणे म्हणजेच खर्‍या अर्थाने व्यक्तिमत्वविकास असल्याचे प्रतिपादन झेड. बी. पाटील महाविद्यालयाच्या उपप्राचार्या प्रा.डॉ.शारदा शितोळे यांनी केले. त्या आर.सी.पटेल अभियांत्रिकी महाविद्यालय व विद्यार्थी कल्याण विभाग, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ यांच्या संयुंक्त विद्यमाने ‘युवतीसभा’ अंतर्गतव्यक्तिमत्व विकास कार्यशाळेत बोलत होत्या. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे. बी. पाटील,उपप्राचार्य डॉ. पी.जे.देवरे विभाग प्रमुख प्रा.सुहास शुक्ल, प्रा. निलेश साळुंखे, प्रा. नितीन पाटील, प्रा. व्हि. एस. पाटील, प्रा. डी. आर. पाटील, प्रा.डी.एस.लाल आदी उपस्थित होते.

युवतींना व्यायामाचे महत्व दिले पटवून द्वितीय सत्रात कॉटेज हॉस्पिटलच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. शीतल शिंदे महिलांचा दैनंदिन आहार त्यातील जीवनसत्वे या विषयी मार्गदर्शन केले. महिलांसाठीशासनाद्वारे राबविण्यातयेत असलेल्या विविध वैद्यकीय योजनांची माहिती दिली. युवतींनी आरोग्यसंबंधित समस्यांवर मात करण्यासाठी व्यायाम,प्राणायाम, योग नियमित करण्याची गरज असल्याचे ही डॉ.शिंदे यांनी नमुद केले.सिव्हील हॉस्पिटलच्या आर. वाय. एस. के. विभागाच्या समन्वयक डॉ.कोमल पाटीलयांनी विद्यार्थीनींना आरोग्याविषयी मार्गदर्शन केले युवतीसभेअंतर्गत पार पडलेल्या या कार्यशाळेचे यशस्वी संयोजन महाविद्यालयाच्या विद्यार्थी कल्याण विभागाचे प्रमुख प्रा.विजय सूर्यवंशी यांनी केले. प्रा. अमृता भंडारी, प्रा. स्मितल पाटील यांनी सुत्र संचालन केले. प्रा. शैलजा पाटील यांनी आभार मानले.

विकासात स्त्रीयांची भूमिका
आधुनिक काळात स्त्री पुरुषांच्या बरोबरीने शिक्षणासह जीवनाच्या सर्वच क्षेत्रात कर्तुत्त्वाची व यशाची नवनवीन शिखरे पादाक्रांत करीत आहे. क्रीडा, नोकरी, व्यवसाय अश्या सर्वच स्तरांवर प्रगती करत आहे. कुटुंबाचा सामाजिक आणि आर्थिक असा सर्वांगीण विकास घडवून आणण्यासाठी स्त्रीयांची भूमिका महत्वपूर्ण ठरत आहे. त्यांनी व्यक्तिमत्व विकास संभाषण कौशल्य, बौद्धिक चाचणी तसेच व्यक्तिमत्व विकासातून यशस्वीजीवनाची वाटचाल कशी करावी या संदर्भात मार्गदर्शन केले.