शिरूर । शिरूर येथील आकांक्षा एज्युकेशनल फाउंडेशन या विशेष मुलांच्या संस्थेमध्ये जागतिक अपंग दिनानिमित्त विशेष मुलांना जादूचे प्रयोग दाखविण्यात आले. शिरूर येथील रामलिंग रोडवर असणार्या आकांक्षा एज्युकेशनल फाउंडेशन ही विशेष मतिमंद मुलांची संस्था आहे. या संस्थेत अपंग दिनानिमित्त जादुगार प्रकाश शिरोळे यांनी विविध जादूचे प्रयोग करून दाखविले.
प्रारंभी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्ज्वलन दंतर कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी खुशालचंद बोरा, अॅड.एन.एस. पवार, शिक्षण मंडळाच्या सभापती रोहिणी बनकर आदींनी मनोगत व्यक्त केले. संस्थेच्या संस्थापिका राणी चोरे यांनी प्रास्ताविक केले. नगरसेवक उज्ज्वला बरमेचा, ज्योती लोखंडे, मनिषा कालेवार, विश्वस्त मनसुख गुगळे, डॉ.वैशाली साखरे, डॉ.मनिषा चोरे यांसह तहसिलदार रणजित भोसले यांनीही भेट देऊन शुभेच्छा दिल्या.