आकार मित्र मंडळाकडून कलावंताला आर्थिक मदत

0

कर्वेनगर । कोथरुडमधील डहाणूकर कॉलनीमधील आकार मित्र मंडळाकडून टिंब टिंब टिंबाली या गाण्याचे गीतकार उत्तम कांबळे यांना 21 हजाराची आर्थिक मदत करण्यात आली. मंडळाचे विश्‍वस्त सचिव फोलाणे यांनी ही माहिती दिली.

गणेशोत्सव काळात सजावट, मिरवणूक, ढोल-ताशा पथक, देखावा यासाठी लागणार्‍या खर्चात कपात करून ती मदत गरजू लोकांना करण्यासाठी आकार मित्रमंडळ या पुढे कायम कटिबद्ध राहील, असे फोलाणे यांनी सांगितले. या सामाजिक उपक्रमाने कोथरुड परिसरात माणुसकीच्या जाणिवेचे दर्शन दिले आहे. टिंब टिंब टिंबाली हे गाणे कायम कानावर पडत असले तरी या गाण्याच्या गीतकाराची आर्थिक परिस्थिती खालावलेली समजल्याने मंडळाकडून मदतीचा हात पुढे करण्यात आला. लोककलावंतांसाठी विधानभेत विषय मांडणार असल्याचे आमदार मेधा कुलकर्णी यांनी यावेळी सांगितले. पोलिस सहआयुक्त रवींद्र कदम, अभिनंदन थोरात, अलंकार पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक रेखा साळुंखे, महेंद्र कडू, अजित सोमवंशी आदी उपस्थित होते.