पुणे-आकाशवाणी केंद्रावरून सुधा नरवणे असा शब्द प्रादेशिक कानावर पडायचा परंतु हा शब्द आता कधीही कानावर येणार नाही कारण , आकाशवाणीवरील निवेदिका सुधा नरवणे यांचा हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. २२ जुलैला त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्या ८८ वर्षांच्या होत्या.
निवेदनासोबतच लेखिका म्हणूनही त्यांची वेगळी अशी ओळख होती. त्या आपल्या लघुकथांसाठीही ओळखल्या जायच्या. त्यांच्या आजवरच्या कामगिरीबद्दल राज्य शासनासोबतच इतरही बऱ्याच पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आले होते.
सुधा नरवणे यांनी तरुण वयातच लेखनाला सुरुवात केली होती. ‘इंद्रधनू’, ‘ते अठरा सेकंद’, ‘जननी: माता, कन्या, मातृत्व’ ही त्यांची पुस्तकं प्रसिद्ध आहेत. ऑल इंडिया रेडिओचं प्रादेशिक केंद्र असणाऱ्या पुणे केंद्रासाठी त्यांनी दहा वर्षांहून अधिक काळ निवेदिका म्हणून काम पाहिलं होतं. त्यांच्या जाण्यामुळे रेडिओ आणि आकाशवाणीच्या विश्वातून एक ज्येष्ठ आवाज हरपला अशी भावना व्यक्त करण्यात येत आहे.