आकाशवाणी चौकात ट्रालाची कारला धडक

0

जळगाव : आकाशवाणी चौकातील सिग्नलजवळ उभ्या असलेल्या कारला मागून येणार्‍या भरधाव ट्रालाने धडक दिल्याने चालकाच्या बाजूचा भागाचे पुर्णपणे नुकसान झाले असून दोन्ही वाहने जिल्हा पेठ पोलीस स्थानकात जप्त करण्यात आले आहे. मात्र यात कोणत्याही पद्धतीची जिवीतहानी झाली नाही. दरम्यान ट्राला चालकाच्या निष्काळजीपणामुळे कारला जोरदार धडक दिल्याचे कार चालकाने सांगितले. सुत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्रभात कॉलनीकडून येणारी कार क्र( एमएच 12 एमसी 78) आकाशवाणी चौकात सिग्नल लागल्याने चालकाने कार थांबविली. याचवेळी ट्राला क्र.(एमएच 18 बीए 9970)च्या चालक योगेश पाटील याने सिग्नल पार करून या उद्देशाने पुढे जाण्याच्या प्रयत्नात कारच्या चालकाच्या बाजूस जोरदार धडक दिली. त्यामुळे कारचे चाकलाच्या बाजूचे नुकसान झाले. ट्रालाची कारला धडक दिल्याने कोणतीही जिवीतहानी झाली नाही. आकाशवाणी चौकात मात्र या धडकेनंतर काही वेळ वाहतूकीचा खोळंबा झाला होता. शहर वाहतूक पोलीसांनी तात्काळ वाहतूक सुरळीत केली. आणि दोन्ही वाहनांना जिल्हा पेठ पोलीस स्थानकाच्या आवारात जमा करण्यात आले.

दोन्ही वाहने पोलीसात जप्त
ट्राला हा धुळ्याचे मालक परेश खंडेलवाल यांच्या मालकीचा असून रिकामा ट्राला धुळ्याकडून माल भरण्यासाठी नशिराबादकडे जात होता. वाटेत खोटेनगर येथे चालक योगेश पाटील यांच्या नातेवाईकांकडे थोडा आराम करून पुन्हा नशिराबादकडे जाण्यासाठी निघाले. आकाशवाणी चौकातील सिग्नल लागल्यानंतर कार अचानक थांबली त्यामुळे भरधाव येणारा ट्राला कारवर धडकला. रात्री उशिरापर्यंत जिल्ह पेठ पोलीसात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.