आकाशवाणी चौकात सुबोनियो रोटरी ईस्ट कट्ट्याचे लोकार्पण

0

जळगाव । चार भिंतीत चालणारे कार्य रोटरी ईस्टने समाजपयोगी कट्ट्याच्या माध्यमातून लोकाभिमूख केले आहे असे जळगाव जनता बँकेचे माजी अध्यक्ष व बांधकाम उद्योजक संजय बिर्ला यांनी प्रतिपादन केले. आकाशवाणी चौकात श्री दत्त मंदिराशेजारी साकारलेल्या सुबोनियो रोटरी ईस्ट कट्ट्याच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते.

अबालवृद्धांसाठी कट्टा उपरोगी
याप्रसंगी रोटरीचे ज्येष्ठ मार्गदर्शक छबिलदास शहा, ईस्टचे अध्यक्ष डॉ.गोविंद मंत्री, सहसचिव विनोद पाटील, सुबोनियोचे संचालक सुबोध चौधरी, सुनिल चौधरी व अरुण बर्‍हाटे यांची प्रमुख उपस्थिती होती. रोटरी ईस्टने शहर सौंदर्यीकरणात सहभाग म्हणून 60 व्यक्ती बसू शकतील असे अ‍ॅम्पीथिएटर कट्ट्याच्या रुपाने तयार केले आहे. सकाळी फिरायला येणारे व्यक्ती व संध्याकाळी लहान मुले महिला अशा अबालवृद्धांसाठी हा कट्टा उपयोगी ठरेल असा विश्‍वास अध्यक्ष डॉ.गोविंद मंत्री यांनी व्यक्त केला. छबिलदास शहा यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी रोटरी ईस्ट सदस्यांच्या 24 गुणवंत पाल्यांचा पालकांसह सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन सुजाता मुणोत यांनी तर आभार वर्धमान भंडारी यांनी मानले.