आकाश धनगर ठरला कॅशलेस पुरस्काराचा मानकरी

0

जळगाव। ज.जि.म.वि.सह समाजाच्या नुतन मराठा महाविद्यालयाचा राष्ट्रीय सेवा योजना विभागाचा आकाश धनगर याची उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ स्तरीय पुरस्कारसाठी निवड झाली आहे. विद्यापीठाद्वारे स्मृतिचिन्ह, पाचशे रुपये रोख, प्रमाणपत्र देऊन गौरव केला जाणार आहे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एल.पी.देशमुख, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा.पडलवार एस.व्ही., उपप्राचार्य प्रा.डी.डी.पवार, प्रा.डॉ.एस.डी.पाटील यांच्या हस्ते त्यांचा महाविद्यालयातर्फे सत्कार करण्यात आला.

केंद्र शासनातर्फे कॅशलेस धोरणाची अंमलबजावणी केली जात आहे. या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी जनजागृती़ करण्याचे आवाहन विद्यापीठाने केले होते. त्यानुसार महाविद्यालयाचा विद्यार्थी आकाश धनगर याने असोदा, ममुराबाद, ईदगाव, टाकरखेडा, पाळधी या गावात जावून ग्रामस्थांना स्मार्ट मोबाईलद्वारेकॅशलेस व्यवहार कशा प्रकारे करावेत याचे प्रशिक्षण दिले बँकेमध्ये जावून फॉर्म भरणे, विविध प्रकारचे बिल भरणे आदींची माहिती देऊन प्रशिक्षण दिले.