आक्रमक आंदोलनानंतर आठवड्याचा अल्टिमेटम

0

जळगाव । केळीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना तत्काळ मदत मिळावी, यासह विविध मागण्या घेऊन तसेच सरकारचा रोष व्यक्त करण्यासाठी राष्ट्रवादी किसान सभेतर्फे दुपारच्या सुमारास केळीफेक आंदोलन करण्यात आले. कोर्ट चौकात आंदोलनकर्ते जमले. याठिकाणी मोदी सरकारचा निषेध असे फडणवीस सरकारचा निषेध असेा, अशा घोषणा देण्यात आल्या. यानंतर छत्रपती शिवाजी महाराज रांच्या पुतळ्यास मार्ल्यापण करून केळी रस्त्यावर फेकण्यात आली. दोनही बाजुंची वाहतूक ठप्प झाली होती. पोलीस व आंदोलनकर्त्यांमध्ये झालेल्या धक्काबुक्कीनंतर माजी मंत्री गुलाबराव देवकर व प्रदेशाध्यक्ष शंकरअप्पा धोंडगे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी रस्त्यावर बसणार्‍या कार्यकर्त्यांना पोलिसांनी हिसकावून लावले. यामुळे बराच वेळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी राष्ट्रवादी काँगेसचे किसान सभा प्रदेश अध्यक्ष शंकर अण्णा धोंडगे, जिल्हाध्यक्ष सोपान पाटील,माजी पालकमंत्री गुलाबराव पाटील, माजी आ.अरूण पाटील, अ‍ॅड.रविद्र भैय्या पाटील, महिला प्रदेश सरचिटणीस मंगलाताई पाटील, प्रदेश प्रतिनिधी प्रतिभा शिरसाट, जिल्हा युवती प्रमुख कल्पीता पाटील,शंकर गायकवाड, ईश्‍वर पंडित, बापुराव परदेशी, अरविंद मानकर, विलास पाटील शिवाजीराव बनकर, युवाध्यक्ष ललित बागुल आदीसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

नागरिकांनी नेली केळी
राष्ट्रवादी किसानसभेच्या आंदोलनकर्त्यांनी आज जळगावात शिवतीर्थ मैदानासमोर केळीफेक आंदोलन केले. ट्रॅक्टरभर केळी रस्त्यावर फेकण्यात आली. आंदोलनानंतर नागरिकांनी ही केळी उचलून नेली. आंदोलनानंतर रस्त्यावरून येणार्‍या जाणार्‍यांनी येथे गर्दी करुन केळी उचलली. त्यामुळे काही वेळानंतर रस्त्या थोडा मोकळा झाला होता.

या आहेत मागण्या
तातडीची मदत म्हणून हेक्टरी 1 लाख रूपये द्यावे, टिश्युकल्चरची रोपे अनुदाने द्यावी, थकीत कर्जासह सर्व कर्ज माफ करावे, नविन कर्ज तात्काळ द्यावे, वाढीव वीजबिले माफ करावी, बोळअळरीचे हिवाळी अधिवेशनात घोषित केलेल्या मदतीप्रमाणे पैसे द्यावे, स्वीमीनाथ समितीच्या शिफरशी त्वरित लागु कराव्यात, खरेदी झालेल्या धान्याच्या पैसे त्वरित मिळावे.

आम्ही शेतकर्‍याची मुले, अतिरेक्याची नाही!
आंदोलनाची रितसर परवानगी घेतली होती. आंदोलनकर्त्यांना सुरक्षा म्हणून पोलीस यंत्रणा हवी होती, मात्र त्यांनी केवळ गिरीश महाजन यांच्या कार्यालयाला प्रोटेक्टश दिले. आम्ही सावलीत शेतकरी नेत्यांचे दोन शब्द ऐकण्यासाठी खाली बसले होते. पोलिसांनी येऊन लाथा बुक्क्यांनी मारहाण करून, कार्यकर्त्यांना दंडे मारून दडपशाहीचा प्रयत्न केला. पोलिसांनी माणुसकीने वागावे, आम्ही शेतकर्‍यांचे मुले आहोत अतिरेक्याची नाही. अशा संतप्त शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा जिल्हाध्यक्ष ललित बागुल यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलनानंतर प्रतिक्रिया दिली.

पोलिसांच्या भूमिकेवर संताप
गिरिष महाजन यांनी रावेर दौरा केला असतांना 15 दिवसात नुकसान भरपाई देण्याचे आश्‍वासन दिले होते. ते पूर्ण न झाल्राने शासनाचा व ना गिरिष महाजन यांच्या निषेधार्थ सरकारवर रोष व्यक्त करण्यासाठी केळी फेक आदोलन करण्यात आले, आगामी 8 दिवसात नुकसान भरपाई न मिळाल्यास मध्य प्रदेश सिमेवर मोठे आदोलन करण्यात येईल, आम्ही लोकशाही पध्दतीने आदोलन करीत असतांना पोलिसांनी दडपशाही भूमिका अवलंबुन आम्हाला रोखले, मारहाण केली व आदोलन दडपण्याचा पूर्ण प्रयत्न केला. मी 70 टक्के अपंग आहे, मला खाली पाडून माझ्यासह आंदोलनकर्त्यांना मारहाण झाली. ही हुकुमशाही असल्याचा आरोप सोपान पाटील यांनी केला.

गोंधळात हरविला होता मोबाईल
गिरीश महाजन यांच्या कार्यालयसमोर आंदोलनकर्ते व पोलीस भिडले. यावेळी गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होेते. केळी फेकण्यापासून पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना हटकले. दरम्यान, या गोंधळानंतर प्रदेश प्रतिनिधी प्रतिभा शिरसाट यांचा मोबाईल काही काळ गहाळ झाला होता. धक्काबुक्की करती असताना पोलिसांनी तो हिसकावल्याचा आरोप प्रतिभा शिरसाट यांनी केला. मोबाईल गहाळ झाल्याने गोंधळ वाढला होता. थोड्या वेळानंतर हा मोबाईल त्यांना परत मिळाला.

शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांना न्याय मिळावा म्हणून हे आदोलन करण्यात आले होते. पोलिसांनी हे आदोलन दडपण्याचे काम केले आहे. पोलिसांनी धक्का बुक्की केली आहे. ही वस्तुस्थिती आहे.
– रविंद्र भैय्या पाटील

शेतकर्‍याचे 500 कोटींच्या आसपास नुकसान होवूनही शेतकर्‍यांना आजपर्यंत कोतीच मदत या सरकारकडून मिळालेली नाही, शेतकर्‍यांना मदत मिळावी यासाठी लोकशाही मार्गाने आदोलन केले. मात्र हे सरकार दुप्पटी भूमिका घेत आहे. त्यामुळे आज केळी फेक आदोलन करावे लागले.
– गुलाबराव देवकर, माजी मंत्री