मुंबई । संघात आक्रमक चढाईपटू असतील तर बचावही तेवढ्याच चांगल्या पद्धतीने केला जातो असे मत प्रोकबड्डीतील फ्रँचायझी यू मुंबाचे मार्गदर्शक इ भास्करन यांनी व्यक्त केले. प्रो. कबड्डीच्या पाचव्या सत्रातील सामन्यांना 28 जुलैपासून सुरुवात होत आहे. यावेळी या लीगमध्ये आणखी चार नव्या संघांचा समावेश करण्यात आला आहे.
यावर्षी झालेल्या खेळाडूंच्या लिलावात यु मुंबाने परिचीत चेहर्याऐवजी अनोळखी खेळाडूंना संघात घेतले आहे. भास्करन म्हणाले की, यु मुंबाची खेळाडूंची निवड करण्याची पद्धत वेगळी आहे. अपरीचीत खेळाडूंना या लीगसाठी वेगळ्या पद्धतीने तयार करतो. त्यामुळे इतर संघाचा यु मुंबाकडे बघण्याचा दृष्टीकोन वेगळा असतो. ते आमच्याासाठी आव्हान असते. त्यामुळे आम्हाला हरवण्यासाठी आपसूकच त्यांच्यावर जास्त दडपण येते.
यु मुंबाचे मार्गदर्शक इ भास्करन यांचे मत
दुसर्या सत्रात विजयी ठरलेल्या आणि दोन वेळा लीगच्या अंतिम फेरीत स्थान मिळवणार्या यु मुंबा संघाची जोरदार तयारी सुरु आहे. यु मुंबाचा संघ डेहारादून येथे सरावात मग्न आहे.