आक्रोड खा, गुडघ्याचे दुखणे पळवा

0

बहुतेक जणांना गुडघ्याच्या दुखण्याने त्रस्त व्हावे लागते. वाढत्या वयामुळे ही समस्या अधिक गंभीर बनते. जर या समस्येने कुणी त्रस्त असेल, तर त्यावर पर्याय म्हणून अक्र्रोडचे सेवन करणे अत्यंत गुणकारी आहे. अनहेल्दी फूड, व्यायामाचा अभाव यामुळे भारतात गुडघे दुखीची समस्या अधिक प्रमाणात उद्भवते. याआधी ही समस्या 40-45 वयोगटातील लोकांना उद्भवत होती, आता लोकांचे जीवनमान बदलल्याने यापेक्षा कमी वयातील लोकांना गुडघे दुखी होऊ लागली आहे. त्यातील 25 टक्के लोकांचे गुडघे निकामी होत आहेत. त्यामुळे हे लोक दररोजचे कामही सहजगत्या करू शकत नाहीत. त्यामुळे यावर उपाय म्हणून अकरोड हे जालीम औषध आहे. अकरोडमध्ये प्रोटीन, फॅट, कार्बोहाइड्रेट, व्हिटॅमीन ई, बी6, कॅल्शियम आणि खनिजे पर्याप्त स्वरूपात उपलब्ध होतात. यामुळे सूज कमी होण्यासाठीही मदत होते.