आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणी अ‍ॅड. अभय पाटील यांना जामीन

0

पाचोरा । येथील काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अ‍ॅड. अभय पाटील यांच्या विरुद्ध फेसबुकवर आपत्तीजनक पोस्ट टाकल्याबद्दल शिवसेनेच्या जावेद शेख यांनी केलेल्या तक्रारीवर 7 जुलै, 2017 रोजी पाचोरा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यात आज पाचोरा पोलीस स्टेशनला अभय पाटील चौकशीसाठी गेले असता त्यांना तेथे अटक करण्यात आली. त्यांना पाचोरा पोलिसांनी अटक करून पाचोरा न्यायालयात हजर केले असता त्यांना पाचोरा न्यायालयाने तात्काळ जामिनावर मुक्त केले. पोलिसांतर्फे सरकारी वकील श्री. अग्रवाल यांनी तर अभय पाटील यांच्यातर्फे अ‍ॅड. सुनील पाटील यांनी काम पाहिले. त्यांना या कामी अ‍ॅड. मंगेश गायकवाड, अ‍ॅड. प्रवीण पाटील, अ‍ॅड. रविंद्र राजपुत, अ‍ॅड. राहुल पाटील, अ‍ॅड. किशोर पाटील यांनी काम पाहिले. यावेळी काँग्रेसचे जिल्हा आरोग्य सेलचे सचिन सोमवंशी, सदाशिव पाटील, मिलिंद साळवे, अनिरुद्ध साळवे, सोमनाथ तुपे, जितेंद्र पाटील, शशिकांत पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी कोर्ट आवारात उपस्थिती दिली.