पहूर । जामनेर तालुक्यातील तोंडापुर येथील एका व्हॅटसप ग्रृपवर मराठा समजा बद्दल आक्षेपार्ह मजकूर टाकल्यामुळे तोंडापुर येथील युवका विरुद्ध संभाजी ब्रिगेडचे तालुका कार्याध्यक्ष गोपाल पाटील यांच्या फिर्यादीवरून पहूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यास अटक करण्यात आली आहे. तोंडापुर येथील ‘तोंडापुर परिसर’ या व्हॅटसपगृपवर मराठा समजाबदल आक्षेपार्ह मजकूर आढळून आला असता येथील येथील मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी थेट पहूर पोलिस ठाण्यावर मोर्चा आणून संबधितावर गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी केली. यावेळी सहा पोलीस निरीक्षक मोहन बोरसे यांनी व्हॅटसपगृपवरून चौकशी केली असता तोंडापुर येथील कल्पेश कोटेचा याने हा मजकूर टाकल्याचे निष्पन्न होताच कल्पेश कोटेचा विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. यावेळी सरपंच प्रभाकर, माजी सरपंच जगदीश पाटील, सुनील कालभिये, ज्ञानेश्वर पाटील, नवनीत खिंवसरा, अमोल ठोंबरे, राजू गाढवे, जितेंद्र पाटिल, अमोल पाटील, बंटी पाटील, भूषण कानळदे, आबा पाटील यांच्यासह मराठा युवक उपस्थित होते.