आक्षेपार्ह वक्तव्याचे पडसाद : पोलिस निरीक्षक बकालेंच्या बडतर्फीसाठी स्वाक्षरी मोहिम
आक्षेपार्ह वक्तव्याचे पडसाद : मुक्ताईनगरासह बोदवड शहरातील मराठा समाज आक्रमक
Signature campaign for dismissal of Police Inspector Bakale बोदवड : गुन्हे शाखेतील पोलिस कर्मचार्याशी संवाद साधताना गुन्हे शाखेतील तत्कालीन निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी मराठा समाजाविषयी अत्यंत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने त्यांच्याविरोधात बडतर्फीची कारवाई करण्यासाठी विभागातील मराठा समाज आक्रमक झाला आहे. बोदवडसह मुक्ताईनगरात या मागणीसाठी मराठा समाजातर्फे स्वाक्षरी मोहिम राबवण्यात आली.
यांनी नोंदवला सहभाग
बोदवड शहरातील आंबेडकर चौकात दोन दिवस स्वाक्षरी मोहिम राबवण्यात आली. या मोहिमेसाठी नगराध्यक्ष आनंदा पाटील, सुनील बोरसे, संजय गायकवाड, हर्षल बडगुजर, शांताराम कोळी, कलीम शेख, नगरसेवक राजेश नानवाणी, नगरसेवक सईद बागवान, दिनेश माळी, गोलु बरडिया गोपाळ पाटील यांच्यासह कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला. यावेळी अॅड.रवींद्र पाटील यांनी सुद्धा स्वाक्षरी करून पाठींबा दिला. विनोद पाडर, शांताराम गंगतिरे, देवेंद्र खेवलकर, जयदीप शेळके, निवृत्ती ढोले, अनंत वाघ, महेंद्र पाटील, संजय पाटील, जिया शेख, निलेश ठाकरे यांच्यासह विविध समाजाच्या प्रतिनिधी व नागरीकांच्या स्वाक्षर्या आहेत. स्वाक्षर्यांचे निवेदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमदार चंद्रकांत पाटील यांना पाठवण्यात येणार आहे.
मुक्ताईनगरातही स्वाक्षरी मोहिम
मुक्ताईनगर : निलंबित पालिीस निरीक्षक किरण बकाले यांना बडतर्फ करण्यासाठी आमदार चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मुक्ताईनगरातील मराठा समाज बांधवांनी मुक्ताईनगराील प्रवर्तन चौकात स्वाक्षरी मोहिम राबवली. अनंतराव देशमुख, दिनेश कदम, नवनीत पाटील, दिलीप पाटील, संतोष मराठे, गणेश पाटील, तानाजी पाटील, राहुल शेळके, संदीप बागुल, नरेंद्र गावंडे, संतोष पाटील, अविनाश बोरसे, प्रफुल्ल पाटील, पप्पू मराठे, सोपान मराठे, किरण महाजन, पिंटू चव्हाण व मराठा समाजबांधव उपस्थित होते. मराठा युथ फाऊंडेशन यांच्या वतीने स्वाक्षरी मोहिम राबवण्यात आली.