आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी राखी सावंतला अटक

0

मुंबई : आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी आयटम गर्ल राखी सावंतला अखेर पंजाब पोलिसांनी अटक केली आहे. भगवान वाल्मिकी आणि त्यांची साधना करणाऱ्या काही भक्तांबद्दल राखी सावंतने वादग्रस्त वक्तव्य केले होते. सोमवारी राखी सावंतला अटक करण्यासाठी पंजाब पोलीस लुधियानाहून मुंबईसाठी रवाना झाले होते. सतत वादात असणा-या राखी सावंतविरोधात स्थानिक न्यायालयाने अटक वॉरंट जारी केल्यानंतर पोलीस कारवाई करण्यासाठी रवाना झाले होते.  9 मार्च रोजी न्यायालयाने राखी सावंतला हजर राहण्याचा आदेश देऊनही हजर न राहिल्याने अखेर अटक वॉरंट जारी करण्यात आला होता. यापूर्वीही राखी सावंत आपल्या हटके आणि वादग्रस्त वागण्यामुळे चर्चेत आली आहे.