जळगाव। खान्देशात आखाजीचे अधिक महत्व असते. सगळ्याच वर्गातील लोक आतुरतेने यासनाची वाट बघत असतात सासुरवासिनीचा सन म्हणून देखील ओळख आहे. प्रामुख्याने जळगाव जिल्ह्यात अधिक उत्साहात उत्सव साजरा करण्यात येत असतो. नोटबंदी नंतर मंदीच्या वातावरणात बाजार भागात मोठी गर्दी खरेदी करण्यासाठी दिसून आली आहे. आंबे ,टरबूज , डांगर अशा विविध फळाची नागरिकांच्या वतीने मोठी मागणी आहे. नवीन वस्तू खरेदी करण्याकडे नागरिकांचा अधिक कल असल्याने या दोन ते टीम दिवसात लाखोंची उलाढाल होण्याची शक्यता व्यापारी वर्गाकडून वर्तवण्यात आली आहे. बांधकाम क्षेत्रात देखील तेजी येईल अशी अशा व्यावसायिकांनी लावून धरली आहे.
लाखोंची उलाढाल
नवीन वस्तू अथवा घर खरेदी करण्यासाठी आखाजीचा योग्य जुळून आलेला आहे. यामुळे बांधकाम व्यावसायिकांनी लाखोंची उलाढाल होऊ शकते असा अंदाज बंदला आहे. नवीन वाहने खरेदी करण्याचीही तरुण वर्गात मोठे आकर्षण असते यामुळे मोटार वाहने, दुचाकी येणार्या दोन दिवसात खरेदी करण्याची लगबग तरुण वर्गात आहे. अनेक नवीन स्पोर्ट वाहने तसेच वस्तू बाजारात दाखल झाले. असून बुकींग करण्याचे कामे देखील सुरु झाले, यामुळे बाजार
तेजीत आहे.
ग्रामीण भागात झोक्याचे आकर्षण
उन्हाच्या सुट्या निम्मिताने बालवयातील विद्यार्थ्यांचा मामाच्या गावाला जाण्याचा बेत आखला जातो. दिवाळी प्रमाणे आखाजीचे अधिक महत्व असल्याने विसावा घेण्याचा क्षण सासुरवाशीण असलेल्या लेकीला असतो. सासरची जबादारी सांभाळताना दिवाळी नंतर ह्याच दिवसात माहेरी जाण्याची संधी त्यांना मिळते. ग्रामीण भागात झोक्याचे महत्व अधिक असल्याने संपूर्ण गावातील महिला एकत्र येऊन झाडाला दोर लावून झोका खेळण्याचा आनंद घेतात. ह्याच दिवशी जेवणाचा मान दिलेल्या लेकीला आणि जावयाला गौराई ,महादेव म्हणून संबोधले जाते.
बाजारपेठ गजबजली
अक्षय्यतृतीयेचे महत्व खान्देशातील प्रत्येक घरात असून याला पिरांचा देखिलसं म्हणतात पाण्याची घागर भरून त्याच्यावर छोटं मातीचच भांडं ठेउन त्यावरती खरबुज आणि दोन सांजोर्या, दोन आंबे ठेवल्या जातात. यादिवशी पितरांची पूजा केल्यास पुण्य लाभते अशी श्रद्धा नागरिकांची आहे. यामुळे जावयाला जेवणासाठी बोलून पूजा करण्यात येते. पितरांचे श्राद्ध घातल्यास त्यांना मुक्ती मिळते असे देखील मानले जाते. अग्नी पेटवून पूर्वज असलेल्या देवतांना घास टाकण्यात येतो. आमरस, पुरणपोळी, कटाची आमटी, भजी, कुरडई अशी मेजवानी यादिवसात चुलीवर शिजवण्यात येते.
सोने खरेदीसाठी होते ग्राहकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी
अक्षय तृतीयेचा दिवस हा सोने खरेदीसाठी शुभ मानला जात असल्याने त्या दिवशी नागरिक सराफा बाजारात गर्दी करत दुकानातून सोने खरेदी करत असतात. यासोबत काही तर इलेक्ट्रॉनिक वस्तु देखील त्या दिवशी खेरदीचा मुहूर्त समजुन घेत असतात. वाहनांच्या शोरूमध्येही ग्राहकांची वाहन खरेदीसाठी अक्षय तृतीयाला गर्दी दिसून येत असते. हजारो ग्राहक त्या दिवशी वाहन खरेदी करत असतात.
पिंप्राळ्यात बारागाड्या
अक्षयतृतीया निमित्त प्रतिपंढरपूर समजल्या जाणार्या पिंप्राळा नगरीत बारागाड्यांचे आयोजन केले जात असते. त्या दिवशी दिवसभर पिंप्राळ्यात जत्रा भरल्याने बाल-गोपालांपासून अबालवृध्दांपर्यंत खरेदीसाठी यात्रे गर्दी करत असतात. हेच नव्हे तर सायंकाळी निघणार्या बारागाडी पाहण्यासाठी नागरिकांची एकच झुंबड उडत असते. या खेळ्यांच्या दुकानावर बालकांचीही खरेदीसाठी गर्दी होते. अक्षय तृत्तीय असल्याने सकाळपासूनच उत्साहाचे वातावरण असते. सकाळी पुजा केल्यानंतर सायंकाळी बारागाड्यांना पाहण्याचा आनंद सर्वच घेतात. तर आखाजी निमित्त पत्ते खेळण्याची परंपरा देखील असल्याने नागरिक पत्ते खेळतांना दिसून येतात.