भुसावळ। तालुक्रातील खडका व साकारी रेथे अक्षय्र तृतीरेनिमित्त जुगाराचा डाव खेळविला जात असताना पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीवरुन शनिवार 29 रोजी पहाटे 2 वाजेच्रा सुमारास जुगाराच्रा अड्ड्यावर अचानक छापा टाकून कारवाई करण्यात आली. यात पोलीसांनी दोन ठिकाणी धाड टाकून कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती सोपान भारंबे यांसह 56 जणांना अटक केली़. यांच्याकडून 2 लाख 70 हजार 785 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. आरोपींना तालुका पोलीस स्थानकात आणले असता पोलीस स्थानकाबाहेर दिवसभर आरोपींच्या नातेवाईकांसह तालुक्यातील राजकीय पुढार्यांनी गर्दी केली होती.
अक्षय तृतीयेनिमित्त पत्ते खेळण्याची परंपरा ग्रामीण भागात कायम आहे. यानिमित्त खेडोपाडी पत्त्यांचे जुगार रंगतात, तालुक्रातील खडका रेथील ग्रामपंचारतीजवळ असलेल्या राम मंदिराजवळ जुगार अड्डा सुरु असतांना शनिवार 29 रोजी पहाटे 1.45 वाजेच्या सुमारास पहिली कारवाई करण्रात आली़.
खडका येथे 50 जणांना अटक
खडका येथे जुगार खेळणार्या 50 जणांना अटक करण्रात आली. यामध्ये आनंदा सकाळे, ज्ञानेश्वर चौधरी, घनश्याम गावंडे, मोहन भिरुड, सुधीर चौधरी, दत्तात्रय भोळे, रामचंद्र भंगाळे, प्रविण भिरुड, विद्यमान सरदार, गोपाळ पाटील, राजेश पुंजालाल, धनराज कोळी सुधाकर सोनवणे, धरम पवार, संजय कोली, राहुल महाजन, अनिल सरोदे, रितेश सरोदे, पुरुषोत्तम सरोदे, गोवर्धन वाणी, गोकुळ पाटील, ज्ञानेश्वर कोळी, अमोल साळुंखे, रामकुमार चौधरी, योगेश सरोदे, पंकज सरोदे, पगार पाटील, मंगेश पेरले, योगेश जोशी, पंकज लढे, लोकेश खाचणे, गौरव महाजन, गणेश घुले, निलेश महाजन, राकेश महाजन, दिपक महाजन, किरण सरोदे, सुकदेव कोळी, प्रविण सपकाळे, विश्वास कोळी, सुभाष सरदार, वना पाटील, भगवान सरोदे, शांताराम इंगळे, किरण भोळे, शांताराम भोले, सुरेश पवार, दिलीप पाटील, अमर पवार, उमेश सातपुते यांच्याकडून 39 मोबाईलसह पाच दुचाकी असा 2 लाख 56 हजार 235 रुपरांचा मुद्देमाल जप्त करण्रात आला.
साकरीत सहा जणांना अटक
तालुक्रातील साकरी रेथे पहाटे 2.10 वाजेच्रा सुमारास दुसरी कारवाई करण्यात आली यामध्ये पिक संरक्षण सोसायटीच्या मागे काही जण झन्ना मन्ना खेळत असताना छापा टाकला असता बाजार समितीचे सभापती सोपान बळीराम भारंबे रांच्रासह निळकंठ गंगाराम नेहते, सुधाकर बळीराम पाटील, प्रकाश दामू बोंडे, अशोक भावसिंग महाजन, प्रवीण अशोक चौधरी रांना अटक कररात आली़. पकडलेल्या या आरोपींकडून 14 हजार 550 रुपरांची रोकड जप्त करण्रात आली़. आरोपींना सकाळी 11 वाजता तालुका पोलीस स्थानकात अटक करून नंतर त्रांची जामिनावर सुटका करण्रात आली.
सहाय्यक पोलीस अधिक्षक निलोत्पल यांच्या सुचनेनुसार परिवेक्षाधिन सहाय्यक पोलीस अधिक्षक मनिष कलवानिया यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाइक तुषार पाटील, भिमदास हिरे, आरसीपी प्लॉटूनचे पोलीस कॉन्स्टेबल कैलास पाटील, पोलीस कॉन्स्टेबल चेतन निकम, प्रमोद पवार, अनिल मराठे यांनी कारवाई केली.