आखाडा परिषदेची तातडीची बैठक

0

नाशिक । राम रहीम, आसाराम बापू यांच्यासह अनेकांना भोंदू ठरवणारे अखिल भारतीय आखाडा परिषदेचे महंत मोहनदास दहा दिवसांपासून बेपत्ता आहेत. त्यांचे अपहरण झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. महंत मोहनदास यांचा शोध लागत नसल्यामुळे अखिल भारतीय आखाडा परिषद चिंतेत आहे. त्र्यंबकेश्‍वरमध्ये सोमवारी स्वामी सागरानंद यांच्या अध्यक्षतेखाली आखाडा परिषदेची तातडीची बैठक झाली. हरिद्वारचे जिल्हाधिकारी, पोलिस यांच्यासह उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांकडेही तक्रार दाखल करण्यात आली आहे. हरिद्वार पोलिसांचं पथकही त्यांच्या शोधासाठी रवाना झालं आहे. 15 सप्टेंबरला महंत मोहनदास हरिद्वारहून रेल्वेने मुंबईकडे निघाले होते. मात्र या प्रवासातच ते बेपत्ता झाले. तपासात त्यांच्या मोबाईलचं शेवटचं लोकेशन मेरठ दाखवत होतं. मात्र तिथून पुढे त्यांचा मोबाईल बंद झाला.