आगग्रस्तांना धान्य, चादर वाटप

0

जळगाव । भगवान महावीर जन्म कल्याणक महोत्सवानिमित्ताने व आपण समाजाचे काही तरी देणे लागतो याच उद्देशाने अण्णासाहेब सागरमल सांखला अर्बन पत संस्था, श्रीजी कार्पोरेशनचे दीपक सालेचा व राज्य अन्याय विरोधी मंच यांच्यावतीने शहरातील सुप्रीम कॉलनी व शिवाजीनगर भागातील आगग्रस्त पिडीत कुटुंबीयांना गहू , तूरडाळ व प्रत्येकी दोन सोलापुरी चादरींचे वाटप करण्यात आले. माजी मंत्री सुरेशदादा जैन यांच्या निवासस्थानी हा धान्य वाटपाचा कार्यक्रम पार पडला.

या मान्यवरांची होती उपस्थिती
कार्यक्रमास माजी मंत्री सुरेशदादा जैन , सहकार विभागाचे उपनिबंधक मुकेश बारहाते, अनिल सांखला, संगिता पाटील (पाचपांडे), दीपक सालेचा, राजेंद्र सांखला, राज्य अन्याय विरोधी जनजागृती मंचचे प्रदेशाध्यक्ष सुभाष सांखला, जिल्हाध्यक्ष प्रशांत सुरळकर, रईस शेख, प्रशांत पाटील, शिवसेनेचे महानगराध्यक्ष शरद तायडे, माजी उपमहापौर सुनील महाजन, ज्येष्ठ पत्रकार राजेश यावलकर, महेंद्र शहा, रजनीकांत शहा, जितेंद्र छाजेड, तुषार सूर्यवंशी, प्रकाश पाटील, संस्थेचे अमोल जोशी, सुरेंद्र नाईक उपस्थित होते.