आगग्रस्त भागाची पालकमंत्र्यांकडून पाहणी

0

जळगाव । शहरातील तुकाराम वाडीत लागलेल्या आगीमुळे झालेल्या नुकसानग्रस्त भागास पालकमंत्री ना. चंद्रकांत पाटील यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी सोबत आमदार सुरेश भोळे, जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, उपजिल्हाधिकारी जितेंद्र पाटील, तहसीलदार अमोल निकम आदि उपस्थित होते. आगीमुळे झालेल्या नुकसानीची माहिती पालकमंत्र्यांनी जिल्हा प्रशासकीय अधिकार्‍यांकडून जाणून घेतली. तसेच नुकसानग्रस्तांना शासकीय नियमाप्रमाणे देय असलेली आर्थिक मदत तातडीने उपलब्ध करुन देण्याच्या सुचना केल्या. तसेच शहरात अशा घटना घडू नये याची दक्षता घेण्याबाबत यंत्रणेला सुचित केले.