म्हसळा: तालुक्यात आदिवासी समाज मोठ्या प्रमाणात विखुरलेला आहे. उदरनिर्वाहासाठी त्यांना संपुर्ण जंगलात भटकावे लागते. हक्काच्या जमीनी नसल्यामुळे त्यांना वणवण फिरावे लागते. अलीकडे वनहक्क अधिनियम 2006 नुसार आदिवासींना हक्काची जमीन(वनहक्क) प्रमाणे मिळून देण्यास शासन स्तरावर मोठ्याप्रमाणात जनजागृती सुरु असून त्या नुसार म्हसळा तालुक्यांतील आगरवाडा येथील चार आदिवासी कुटुंबांना ते सध्या वास्तव्य करीत असलेल्या घरांच्या जमीनी म्हसळा तहसील कार्यालयात प्रांताधिकारी प्रविण पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत सातबारा व गाव नमूना नं.6 चे वितरित करण्यात आले.
सातबारा, गावनमुना नं.6 चे वितरण
याप्रसंगी तहसीलदार रामदास झळके, नायब तहसीलदार के.टी.भिंगारे, पोलिस सहाय्यक निरीक्षक सुदर्शन गायकवाड, एन.एल.मोरे, मंडल अधिकारी के.एस.देऊळगावकर, तलाठी सलिम शहा, मंगेश पवार, एस.जे.सोरे, पूनम कारंडे आदि मान्यवर उपस्थित होते. यावेळी आगरवाडा येथील मंगेश वाघमारे, शंकर वाघमारे, शांताराम वाघमारे आणि लक्ष्मण वाघमारे यांना सातबारा व गावनमुना नं.6 चे वितरण करण्यात आले. अतिक्रमण केलेल्या जमिनी शासनाने महाराष्ट्र जमिन महसुल नियम 1971 च्या नियम 45 अन्वये तुमच्या नावे झाल्याचे प्रांत अधिकारी प्रविण पवार यांनी आपल्या मनोगतात सांगितले.