आगरी-कोळी युथ फाउंडेशनच्या महिला सदस्यांकडून पेपर आर्ट प्रशिक्षण शिबीर सुरू

0

नेरुळ : बुधवार दिनांक 2 ऑगस्ट 2017 रोजी फाउंडेशन च्या नेरूळ महिला टीमच्या पुढाकाराने पेपर आर्ट ह्या कागदा पासून व्यवसायिक प्रयोजनाच्या वस्तू बनविण्याच्या अनुषंगाने महिलांसाठीच्या विशेष प्रशिक्षण शिबिराची सुरुवात नेरूळ गावातून करण्यात आली. महिलांसाठीच्या इमेशन ज्वेलरी मेकिंग या प्रशिक्षण शिबिराच्या यशस्वी आयोजनानंतर आणि या शिबिराला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर पेपर आर्ट प्रशिक्षण शिबीर सुरू करण्यात आले. या प्रशिक्षण शिबिरासाठी कोणत्याही शासकीय संस्थेची मदत न घेता, गावातील महिलांनी स्वबळावर आणि स्वखर्चाने या शिबिराचे आयोजन केले आहे.

या संपूर्ण उपक्रमाचे नियोजन आगरी-कोळी युथ फाउंडेशनच्या नेरूळ महिला सदस्यांच्या च माध्यमातून केले गेले आहे. पेपर आर्ट उपक्रमाचे स्वतंत्ररित्या गावपातळीवर प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करणार्या नेरुळमधील महिला या इतर गावांतील महिलांच्या तुलनेत ते पहिल्या ठरल्या आहेत. याबाबत या महिलांचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.