आगरी समाज हा कौटुंबिक जिव्हाळा जपणारा समाज

0

ठाणे । आगरी समाज हा तापट समजला जातो. परंतु, तो कौटुंबिक जिव्हाळा जपणारा समाज आहे असे प्रतिपादन खासदार कपिल पाटील यांनी केले.कर्जत तालुका आगरी समाज संघटनेच्या वतीने आयोजित वधूवर परिचय मेळाव्यात खासदार पाटील बोलत होते. दरम्यान, पहिल्या वधूवर परिचय मेळाव्याला विवाह इच्छुक 96 मुले आणि 156 मुली यांनी नोंदणी करून आपली ओळख करून दिली. कर्जत तालुका आगरी समाज संघटनेच्या माध्यमातून आणि टोकरे फाउंडेशनच्या सहकार्याने वधू-वर परिचय मेळावा नेरळ येथील हुतात्मा हिराजी पाटील सामाजिक सभागृहात आयोजित केला होता.

टोकरे फाउंडेशनचे कौतुक
यासंबंधी खासदार कपिल पाटील यांनी आगरी समाज हा कौटुंबिक जिव्हाळा जपणारा समाज आहे, जितकाच कणखर तितकाच दिलदार म्हणून ओळखला जातो. आपण आज आगरी समाज हॉलमध्ये मेळावा घेतला आहे आणि त्यामुळे सामाजिक बांधिलकी जपण्याचा वसा घेतला असल्याबद्दल आगरी समाज संघटना आणि टोकरे फाउंडेशनचे कौतुक केले. त्यापूर्वी माजी महापौर आरती मोकल, अध्यक्ष एकनाथ धुळे, माजी अध्यक्ष नामेदव गोमारे, सावळाराम जाधव, उपाध्यक्ष प्रवीण पाटील यांनी आपली मनोगते मांडली.

मान्यवरांची उपस्थिती
यावेळी राजिप’चे अध्यक्ष सुरेश टोकरे, कल्याण-डोंबिवली महापालिका माजी महापौर आरती मोकल, आगरी समाज संघटनेचे अध्यक्ष एकनाथ धुळे, जिप’चे माजी उपाध्यक्ष लक्ष्मण पेमारे, संघटनेचे माजी अध्यक्ष नागो गवळी, नामदेव गोमारे, सावळाराम जाधव, यांच्यासह कर्जत पंचायत समितीचे सभापती अमर मिसाळ, माजी सभापती धोंडू राणे यासंह अनेक मान्यवर उपस्थित होते.