आगाखान करंडक हॉकी स्पर्धा आजपासून रंगणार

0

पुणे : महाराष्ट्र हॉकी असोसिएशनच्या वतीने 115 व्या अखिल भारतीय आगाखान करंडक हॉकी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा 1 ते 9 डिसेंबरदरम्यान पिंपरी येथील मेजर ध्यानचंद स्टेडियममध्ये होणार असल्याची माहिती महाराष्ट्र हॉकी असोसिएशनचे अध्यक्ष इक्रम खान यांनी दिली.

ही स्पर्धा शालेय व खुला गट अशी दोन विभागात होणार आहे. शालेय गटात 50, तर खुल्या गटात 25 संघ सहभागी होत आहेत. शालेय विभागात 12, 14, 17, 19 वर्षांखालील मुले व मुलींच्या गटाचा समावेश आहे. खुल्या गटात महाराष्ट्रासह जम्मू-काश्मीर, कोलकाता, चंडिगड, हरियाणा, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, नैनिताल, दिल्ली, अंबाला, लखनौ, भोपाळ, बिहार, हैदराबाद आदी संघ सहभागी होणार आहेत. विजेत्यांना आगाखान करंडक, प्रशस्ती पत्रक, पदके देण्यात येणार आहे.