आगामी काळात कॉंग्रेसमध्ये सिद्धूला मिळू शकते मोठी जबाबदारी !

0

नवी दिल्ली-सध्या देशात माजी क्रिकेटर आणि कॉंग्रेस नेता पंजाब सरकारमधील मंत्री नवज्योतसिंह सिद्धू यांची चर्चा आहे. पाकिस्तानमध्ये करतारपूर कॉरिडोरच्या उद्घाटनाला गेल्यामुळे त्याच्यावर टीका होत आहे. कॉंग्रेसमधील काही मंत्री त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहे. मात्र असे असले तरी आगामी काळात पंजाब कॉंग्रेससाठी त्यांना मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. कॉंग्रेस अध्यक्ष यांची जवळीक वाढली असल्याने सिद्धुंवर पंजाबमधील मोठी जबाबदारी पक्षश्रेष्ठी देऊ शकते.

सध्या पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर कौर हे कॉंग्रेसचे मुख्य म्हणून जबाबदारी पार पाडत आहे. पंजाबमध्ये मुख्यमंत्री अमरिंदर यांची प्रतिमा चांगली आहे. परंतू राष्ट्रीय राजकारणात सिद्धूची प्रतिमा अधिक असल्याने भविष्यात सिद्धुला मोठी भूमिका पार पाडावी लागणार आहे.

कॉंग्रेसकडून प्रचारासाठी सिद्धूची अधिक मागणी होत आहे.