आगामी गणेशोत्सवानिमित्त बैठक

0

हडपसर। गणेशोत्सवातून सामाजिक बांधिलकी प्रस्थापित केली जात आहे. हा उत्सव साजरा करताना तरुण कार्यकर्त्यांनी पोलिसांना सहकार्य करावे. सीसीटीव्ही कॅमेरे, स्त्री व पुरुष यांच्या स्वतंत्र रांगा, संशयित हालचालींवर लक्ष देणे अशाद्वारे आपण पोलिसांना मदत करू शकतो. एक वॉट्सअ‍ॅप ग्रुप तयार करून तात्काळ मदतसाठी पोहचू शकतो.

आदर्श गणेशोत्सवासाठी मंडळाचा कार्यकर्ता हा महत्त्वाचा घटक आहे. आपण मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे, असे आवाहन सहाय्यक पोलीस आयुक्त समीर शेख यांनी केले हडपसर परिसरातील विविध मंडळांची व्यक्तीशः भेट घेऊन त्यांना आगामी गणेशोत्सवाबाबत काही सूचना देऊन मंडळाचे कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्याशी शेख यांनी संवाद साधला. हडपसर गावठाण्यातील शिवराज मित्रमंडळ या मंडळाला 50 वर्षे पूर्ण होत आहेत. यावर्षी मंडळ सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त जेजुरी गडावरील मंदिराचा देखावा साकारणार आहे. यावेळी पोलीस निरीक्षक अंजूम बागवान उपस्थित होते.