जळगाव । भारतीय युवक काँग्रसची संघटनात्मक निवडणूक प्रक्रीयेस सुरूवात झाली आहे. यातील पहिला टप्पा हा सदस्य नोंदणी असणार आहे. सदस्य नोंदणीला 11 जूनपासून सुरूवात झाली असून ती 9 जुलैपर्यंत ही प्रक्रीया सुरू राहणार आहे. यानुसार जळगाव जिल्हा युवक काँगे्रस अध्यक्षाची निवड देखील करण्यात येणार आहे. पुणे, नाशिकच्या धर्तींवर जळगाव जिल्ह्यांत देखील जळगाव शहर व ग्रामीण अध्यक्ष असण्याबाबत वरीष्ठ पातळींवर चर्चा सुरू आहे. यात सकरात्मक निर्णय झाला तर जळगाव येथे दोन अध्यक्ष असतील अशी माहिती झोनल रिटरींग ऑफीसर मनोज सारंग यांनी पत्रकार परीषदेत दिली.
युवा काँग्रसमध्ये सदस्यपदाची पात्रता
मनोज सारंग यांनी पुढे सांगितले की, काँग्रसमध्ये लोकशाही पध्दतीने निवडणूक घेवून नेता ठरविण्यात येतो. ही निवड प्रक्रीया तीन महिन्यांत पूर्ण करून नवीन युवक जिल्हाध्यक्ष देवू असा विश्वास सारंग यांनी व्यक्त केला. भारतीय युवक काँग्रेसमध्ये सक्रीर्य सदस्य बनण्यासाठी 4 ओळखपत्र व 4 प्राथमिक सदस्य जोडावे लागणार आहेत. या सक्रीर्य सदस्याला आगामी निवडणूकीत मतदानाचा अधिकार राहणार आहे. युवक काँग्रसचा सदस्य बनण्यासाठी 18 ते 35 वयोगटातील कोणताही तरूण पात्र आहेत. सदस्य बनण्यासाठी कोणत्याही प्रकारे शुल्क आकारण्यात येणार नाही. मात्र, सक्रीय सदस्य होण्यासाठी मुद्रीत फॉर्मसाठी 125 रूपये तर ऑनलाईनसाठी 75 रूपयांची आकारणी करण्यात येणार आहे. सक्रीय सदस्याला 5 मत देण्याचा अधिकार राहणार आहे. यात सक्रीय सदस्य हा प्रदेश अध्यक्ष, प्रदेश सचिव,जिल्हाध्यक्ष, जिल्हा महासचिव व विधानसभा कमिटी अध्यक्ष पदासाठी मतदान करू शकणार आहेत. या निवडणूकीत लोकशाही पध्दतीप्रमाणे महिला, एससी, एसटी, अल्पसंख्यांक यांना आरक्षण दिले गेले आहे. निवडणूक इव्हीएमच्या धर्तींवर टॅबव्दारे घेण्यात येणार आहे. यावेळी जिल्हा युवा काँग्रेस अध्यक्ष पराग पाटील, प्रदेशसचिव डॉ. चंद्रशेखर पाटील, रावेर लोकसभा अध्यक्ष हितेश पाटील, अमळनेर विधानसभा अध्यक्ष अमोल माळी, हर्षल पाटील, प्रमोद माळी, शुभम पाटील, पाडूरंग पाटील, राहुल पाटील, सुधाकर वाघ, मनोज बिर्हाडे, कुंदन माळी आदी उपस्थित होते.