नगर परिषद सभागृहात प्रात्यक्षिक सुरू
हे देखील वाचा
तळेगाव दाभाडे : आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांमध्ये इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन (इव्हीएम) ऐवजी वोट व्हेरिफिकेशन पेपर अकांऊट टँली (व्हीव्हीपीटीए) या मशीनचा वापर मतदान करण्यासाठी करण्यात येणार आहे. याचे प्रात्यक्षिक नगर परिषद सभागृहात घेण्यात आले. यावेळी नगराध्यक्षा चित्रा जगनाडे, महिला बाला कल्याण समिती सभापती संध्या भेगडे, शिक्षण समिती सभापती विभावरी दाभाडे, निलेश गराडे, गणेशाप्पा भेगडे, रविंद्र काळोखे, मंडल अधिकारी अजय सोनवणे, तळेगाव कामगार तलाठी विजय साळुंके, शरद गाडे, संजीव साळवे, तांत्रिक कर्मचारी आर.डी.जगदाळे आदी उपस्थित होते. शासनाच्या धोरणानुसार या नवीन मशीनची माहिती नागरिक, मतदार, लोकप्रतिनिधी यांना व्हावी म्हणून याचे प्रात्यक्षिक शेलारवाडी, परंदवडी, तळेगाव दाभाडे नगर परिषद येथे लोकप्रतिनिधी व मतदारांचे समक्ष घेण्यात आले. या मशीनमध्ये आपण केलेले मतदान बरोबर आहे की नाही याची पडताळणी होते. आपण कोणाला मतदान केले आहे ते मशीनवर आपणास प्रत्यक्ष सहा सेकंद पहावयास मिळते. त्यामुळे या पारदर्शी मशीनचा वापर येणार्या निवडणुकांमध्ये मतदान करण्यासाठी योग्य असल्याचे यावेळी जगदाळे यांनी सांगितले.