आगामी निवडणुकांसाठी जोमाने कामाला लागा
भुसावळ शहरात पदाधिकार्यांसह कार्यकर्त्यांच्या बैठकीत जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे यांचे आवाहन
भुसावळ : वंचित बहुजन आघाडीची जिल्हा बैठक सोमवारी शासकीय विश्रामगृहात जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे यांच्या अध्यक्षेखाली झाली. आगामी काळात होवू घातलेल्या नगर पंचायत, जिल्हा परीषद, पंचायत समिती निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी संपूर्ण ताकदिनिशी उतरणार असून कार्यकर्ता व पदाधिकार्यांनी आतापासून कामाला लागावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे यांनी यावेळे केले.
विविध विषयांवर बैठकीत चर्चा
बैठकीत नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीचा अहवाल आणि वॉर्ड तिथे बूथ या विषयावर देखील चर्चा करण्यात आली. या प्रसंगी कार्यकर्त्यांनी आपापल्या समस्या कथन केल्या. प्रसंगी पदाधिकारी व कार्यकर्ते यांना उद्देशून केलेल्या मार्गदर्शनात जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे म्हणाले की, सर्वांनी मरगळ झटकून टाकून आणि आपापसातील मतभेद यांना मूठमाती देत सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी सत्ता काबीज केली पाहिजे आणि त्यासाठी पक्ष संघटन, वॉर्ड तिथे बूथ बांधणी करावी, असे आवाहन त्यांनी केले.
यांची बैठकीला उपस्थिती
बैठकीस वंचित बहुजन आघाडी पक्षाचे जिल्हा महासचिव दिनेश ईखारे, महिला अध्यक्ष वंदना सोनवणे, जिल्हा संघटक अरुण तायडे, जिल्हा प्रवक्ता अॅड.विनोद इंगळे, जिल्हा उपाध्यक्ष रफिक बेग, जिल्हा उपाध्यक्ष महेंद्र सुरडकर, जिल्हा सचिव नागसेन सुरडकर, जिल्हा संघटक राजेंद्र बारा, महिला आघाडी जिल्हा महासचिव वंदना आराक, जिल्हा महासचिव जरीना तडवी, महिला आघाडी जिल्हा उपाध्यक्षा आशा सोनवणे, महिला आघाडी जिल्हा सचिव पालवे, बोदवड तालुकाध्यक्ष सुपडा निकम, रावेर तालुकाध्यक्ष बाळु शिरतुरे, यावल तालुकाध्यक्ष मनोज कापडे, भुसावळ शहराध्यक्ष गणेश जाधव, रुपेश कुर्हाडे, शुभम असलकर, प्रमिला बोदडे, महिला आघाडी जिल्हा संघटक शोभा सोनवणे, आशा नेहते, भावना भंगाळे, माधुरी भालेराव, शिवाजीराव टेंभुर्णीकर, भुसावळ शहर महासचिव देवदत्त मकासरे, निलेश जाधव, भुसावळ तालुका कोषाध्यक्ष संदीप सुरवाडे, प्रमोद बावस्कर, यावल तालुका सचिव विजय सावकारे, पंकज बारी, सचिन पाटील, रावेर तालुका महासचिव कांतीलाल गाढे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन जिल्हा संघटक अरुण तायडे तर आभार जिल्हा महासचिव दिनेश इखारे यांनी मानले.