आगामी निवडणुकीच्या दृष्टीने जोमाने कामाला लागा – विलास पारकर

0

भुसावळ- आगामी निवडणुकीचा दृष्टीकोन समोर ठेवून शिवसेना शहरासह ग्रामीण भागातून प्रत्येक मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी शिवसंपर्क अभियान सुरू करण्यात आले असून अंतर्गत तालुक्यात 50 हजार सदस्य नोंदणी करण्यात येणार आहे. शिवसेनेच्या कार्याला गती देऊन गाव तिथे शाखा व घर तिथे शिवसैनिक ही संकल्पना राबवा, नवीन शाखांचे उद्घाटन करा, नूतन पदाधिकारी यांनी जोमाने कामाला लागा, जनतेच्या समस्यां सोडविण्यासाठी लोकशाहीच्या मार्गाने पाऊले उचला, आंदोलन करा यामुळे आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत नक्कीच चांगले परिणाम दिसून येतील, असा ठाम विश्वास रावेर लोकसभा संपर्कप्रमुख विलास पारकर यांनी येथे व्यक्त केला.

शिवसेनेचे पद म्हणजे जवाबदारी -पारकर
आगामी लोकसभा-विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रावेर लोकसभा संपर्कप्रमुख विलास पारकर व महिला आघाडी संपर्क संघटक उषा मराठे यांच्या उपस्थितीत नवनियुक्त पदाधिकार्‍यांचा सत्कार व आगामी वाटचाली संदर्भात बैठक भुसावळ येथे शासकीय विश्रामगृहात झाली. नवनिर्वाचीत पदाधिकारी यांचा सत्कार व होणार्‍या सर्व निवडणुकांविषयी मार्गदर्शन करतांना विलास पारकर यांनी यावेळी उपस्थित शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक यांना सांगितले की, शिवसेनेचे पद ही फार मोठी जबाबदारी आहे पक्षाचे काम करतांना जबाबदारीतुन मुक्त न होता जबाबदारीने चांगले काम करायचे आहे . कामाची रूपरेषेनुसार दिलेले काम सर्वानी करावे असा सल्ला वजा सूचना देऊन संघटना बांधणी व मजबुतीकरणा बाबत मार्गदर्शन केले.

यांची बैठकीस उपस्थिती
बैठकीस जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील, भुसावळ विधानसभा संपर्क प्रमुख संजय शिरोडकर, जामनेर संपर्क प्रमुख श्रीकांत पाटील, उपजिल्हा संघटक विलास मुळे, पंचायत समिती सदस्य विजय सुरवाडे, तालुकाप्रमुख समाधान महाजन, उपतालुका प्रमुख हिरामण पाटील आदी शिवसेना पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते .

नूतन पदाधिकार्‍यांचा सत्कार
भुसावळ तालुक्यातील शिवसेनेचे नवनिर्वाचित पदाधिकारी भुसावळ शहरप्रमुख निलेश महाजन ,बबलू बर्‍हाटे, तालुका संघटक प्रा.धीरज पाटील, उपतालुका प्रमुख पप्पू बारसे, विधानसभा क्षेत्रप्रमुख संतोष सोनवणे, विधानसभा संघटक निलेश सुरडकर, जगू खेराडे, योगेश बागुल, वरणगाव शहरप्रमुख रवी सुतार यांच्यासह शिवसेना पदाधिकारी यांचे मान्यवरांचे हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. सूत्रसंचालन ग्राहक संरक्षण तालुका प्रमुख देवेंद्र पाटील तर आभार संतोष सोनवणे यांनी आभार मानले. बैठकीस शिक्षक सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रा.विनोद गायकवाड, रेल कामगार सेनेचे ललितकुमार मुथा, माजी शहर प्रमुख नामदेव बर्‍हाटे, शहर प्रमुख मनोज पवार, राकेश खरारे, सुनील सोनवणे, विक्की चव्हाण, सुरेंद्र सोनवणे, रवी सुतार, निलेश ठाकूर, सतीश चंदने, अब्रार शेख, गोकुळ बाविस्कर, किशोर कोळी, महिला आघाडीच्या पूनम बर्‍हाटे, तालुका संघटक चंद्रकांता बोरसे, उज्वला बागुल, भुराबाई चव्हाण, जयश्री हातेकर, लाटा कोळी, हर्षलता चासे, कविता चौधरी, वासंती चौधरी, विजया महाजन, लक्ष्मीबाई खरे, पुष्पा खरे, ताई पाटील यांच्यासह शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.