मुख्यमंत्र्यांचा खास शैलीत समाचार
खडकी : देशात सध्या भारतीय जनता पक्षासहित पंतप्रधान नरेंन्द्र मोदी यांच्या विरोधात प्रचंड वातावरण बनले आहे. आगामी निवडणुकीत ई. व्ही. एम. मशिनऐवजी मतपत्रिकेद्वारे मतदान प्रक्रीया राबवावी. जागरुक मतदाररुपी जनतेने पुढाकार घेऊन आवाज उठविला पाहीजे, असे मत ज्येष्ठ विचारवंत व भटक्या विमुक्त जमाती संघटनेच्या प्रदेश सरचिटणिस प्रा. सुषमा अंधारे यांनी केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 127 व्या जयंतीनिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारमंच व मैत्री ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी दापोडी तानाजी पुतळा चौक येथे प्रबोधनात्मक व्याख्यान या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी प्रा. अंधारे यांनी आपले विचार व्यक्त केले. आपल्या दीड तासांच्या भाषणात त्यांनी यावेळी पंतप्रधान नरेंन्द्र मोदी सह राज्याचे मुख्यमंत्री देवेंन्द्र फडणवीस यांचा आपल्या शैलीत खास समाचार घेतला.
यावेळी नगरसेविका आशा शेंडगे, नगरसेवक संतोष कांबळे, माजी नगरसेविका चंद्रकांता सोनकांबळे, रिपब्लिकन युवा सेनेचे राहुल डंबाळे, भारिप बहुजन महासंघाचे देवेंद्र तायडे, ज्येष्ठ विचारवंत ताहीर शेख, युवा कार्यकर्ते शेखर काटे ग्रुपचे संस्थापक रवींद्र कांबळे, नितिन शिंदे, मेहबूब शेख यासह विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन ग्रुपचे अध्यक्ष अजय खंडागळे, संजय कांबळे, मोईन मुजावर, अमित जाधव व सिद्धार्थ पगारे यांनी केले.
संविधान बदलण्याचे कारस्थान
व्याख्यानात प्रा. अंधारे पुढे म्हणाले की, केंद्रात मोदी सरकार व राज्यात फडणवीस सरकार सर्व आघाड्यांवर अपयशी ठरले आहे. महागाई बेरोजगारीने जनता त्रस्त झाली आहे. सरकारी नोकर भरती ऐवजी ठेकेदारी कंत्राटी पद्धतीने नोकरभरती प्रक्रीया राबवित देशात भांडवलशाही लादण्याचा प्रयत्न केला जात आहे. देश अधोगतीला नेण्याचे कारस्थान रचले जात आहे. संविधान बदलण्याचा ही कट कारस्थान चालू आहे. देशाचे संविधान त्यामुळे धोक्यात आले आहे. अशा या बेफाम सुटलेल्या भाजपाला लगाम घालण्या करिता आगामी निवडणुकीत जनतेने आपल्या मतांद्वारे त्यांची जागा दाखवून दिली पाहिजे. देशात भाजपा व मोदी शहा विरोधात प्रचंड विरोधाची लाट आहे. मात्र ई.व्ही.एम. यंत्रनेत फेरफार करून सत्ता ताब्यात घेण्यात हे पटाईत आहेत. तेव्हा आगामी निवडणुकीत ई.व्ही.एम.वर बहिष्कार टाकून मतपत्रिकेद्वारे मतदान प्रक्रीया राबवावी. ही मागणी सर्व थरातुन केली जावी व या कामी मतदार रुपी जनतेने ही पुढाकार घेऊन आवाज उठविला पाहीजे.
हे फडणवीस नाही फसवणीस!
राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांचे नाव खरे फसवणीस असायला पाहीजे होते. शेतकरी बेरोजगार तरुण मराठा आरक्षण धनगर समाजाचे प्रश्न आदी बाबत या सर्वांचीच त्यांनी फसवणूक केली आहे. या व्यतिरीक्त ते खोटे बोलण्यात ही पटाईत आहेत. भिमा कोरेगाव दंगल प्रकरणी त्यांनी तक्रार केलेल्या अनिता साळवी व स्वतः आपण तक्रार मागे घेतली म्हणे. अगदी खोटे आम्ही कोणी ही तक्रार मागे घेतली नाही, असे स्पष्टीकरण करीत खरेतर या दंगलीत मुख्यमंत्री फडणवीस सह इतर यंत्रणाही या कटात सहभागी असल्याचा संशय आहे. या घटनेचा मास्टरमाईंड संभाजी भिडे व त्यांच्या यंत्रणेला मदत करणार्यांना आम्ही पाणी पाजल्या शिवाय राहणार नाही.
भिडेबद्दल नागरिकांमध्ये रोष
माजी नगरसेविका सोनकांबळे म्हणाल्या की, भिमा कोरेगांव दंगलीतील सुत्रधार संभाजी भिडे यांना अद्याप अटक न करता त्यांना क्लीनचिट देण्याचा प्रयत्न केला जात असल्याबाबत नागरिकांमधून रोष व्यक्त केला जात आहे. चळवळीचे, समाजाचे लोक केंद्रात व राज्यात पाठविले पाहीजे. मागणारे होऊ नका, देणारे बना. या वेळी प्रा. अंधारे यांचा स्म्रुतीचिन्ह, शाल व पुष्पगुच्छ देवून सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मेहबुब शेख यांनी केले तर स्वागत जाकीर शेख यांनी तर आभार नितिन शिंदे यांनी मानले.