आगामी निवडणुकीत जागा दाखवायची वेळ आली -संजय राऊत

0

लोणावळा :- सध्या मित्र पक्षांचे खच्चीकरण करून त्यांना संपविण्याचे धोरण सुरु आहे. जर देशात असेच चालणार असेल तर, आगामी 2019 च्या लोकसभेच्या निवडणुकीत त्यांना त्यांची जागा दाखवायची वेळ आली आहे. आजपर्यंत महाराष्ट्रात शिवसेनेपुढे अनेकांना गुडघे टेकवायला लागले आहे. जोपर्यंत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे आदेश येत नाही तोपर्यंत आपली भूमिका एकला चलो अशीच राहणार असल्याचा मत संजय राऊत यांनी व्यक्त केली आहे. लोणावळा येथे आयोजित करण्यात आलेल्या मावळ लोकसभा मतदार संघाच्या पदाधिकारी, कार्यकर्ता, लोकप्रतिनिधी प्रशिक्षण शिबिरात मार्गदर्शन करताना राऊत बोलत होते.

मेळाव्यास यांची होती उपस्थिती
यावेळी खासदार श्रीरंग बारणे, आमदार गौतम चाबुकस्वार, संपर्कनेते बाळा कदम, मनोहर भोईर, रेखा ठाकरे, बबन पाटील, उपनेते नितीन बानगुडे-पाटील, सुलभा उबाळे, धनंजय जाधव, वैभव थोरात, मावळ तालुका प्रमुख राजू खांडभोर, लोणावळा शहर प्रमुख सुनील इंगुळकर, महिला संघटक श्रीमती शादान चौधरी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.