आगामी निवडणुकीसाठी महसूल प्रशासनातर्फे जय्यत तयारी

0

वरणगाव : आगामी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी महसूल प्रशासनातर्फे जय्यत तयारी सुरू आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 1990/91 च्या काळातील पाच खोल्यांमध्ये साठवलेले जीर्ण दस्तऐवजांची कायदेशीर विल्हेवाट लावून खोल्यांची सफाई केली जात आहे. तहसील कार्यालयात 1990 91 च्या काळातील निवडणुकांचे दस्तऐवज पाच खोल्यांमध्ये साठवण्यात आले होते. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूूमीवर तहसीलदार कुंदन हिरे यांनी सर्व खोल्या रिकाम्या करण्यासाठी सफाई मोहीम हाती घेतली आहे. सर्व जीर्ण दस्तऐवजांची कायदेशीर विल्हेवाट लावली जात आहे. पाच खोल्यांमधून सुमारे तीन ट्रक भरून जीर्ण कागदपत्रे काढली जात आहेत. जिल्हापरिषदेच्या गटनिहाय तसेच पंचायत समितीच्या गणनिहाय याद्या तयार करण्याचे काम निवडणूक नायब तहसीलदार प्रवीण भिरूड, नायब तहसीलदार सुनील समदाने यांच्या देखरेखीखाली पूर्ण झाले आहे. आगामी 12 जानेवारीला प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध होण्याची
शक्यता आहे.