आगामी निवडणुकीसाठी शिवसैनिकांनी आतापासून कामाला लागा!

0

जळगाव । विधानसभा निवडणूकीला अजून वर्षभराचा अवधी आहे, असे आपण म्हणत असलो तरी डिसेंबर महिन्यानंतर केव्हाही निवडणूक लागू होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांनी आतापासूनच कामाला लागावे. अशा सूचना शिवसेना उपनेते तथा सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिल्या. 2019 मध्ये होवू घातलेल्या विधानसभा, लोकसभा निवडणूकीच्या पार्श्‍वभुमीवर शुक्रवार, 13 रोजी अजिंठा विश्रामगृह येथे शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांची बैठक पार पडली.

यांची होती उपस्थिती होती
यावेळी उपजिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील, माजी सभापती राजू चव्हाण, जि.प. सदस्य प्रताप पाटील, पवन सोनवणे, माजी जि.प. उपाध्यक्ष जानकीराम सोनवणे, कृउबासचे सभापती लक्ष्मण पाटील, संचालक अनिल भोळे, तालुकाप्रमुख नरेंद्र सोनवणे, जळगाव पं.स.चे उपसभापती डॉ. कमलाकर पाटील, धरणगाव पं.स.चे उपसभापती प्रेमराज पाटील, पं.स. सदस्य आसाराम कोळी, समाधान चिंचोरे, जनाआप्पा कोळी, नंदलाल पाटील, उपतालुका प्रमुख पि.एम. पाटील, विधानसभा क्षेत्रप्रमुख संजय पाटील यांसह पदाधिकारी उपस्थित होते.

कामांची संख्या कमी नाही
शिवसेनेने जिल्ह्यात केलेल्या कामांची संख्या कमी नाही, परंतु आपण केलेल्या या कामांच्या प्रचार, प्रसारात आपण कमी पडलोय असे सांगून शिवसेनेला तक्रार करणारा नाही तर तक्रारीचे निवारण करणारा कार्यकर्ता हवा आहे. नेत्यांचा जसा विश्‍वास कार्यकर्त्यांवर आहे तसा विश्‍वास कार्यकर्त्यानेही ठेवावा असे आवाहनही त्यांनी केले.