अमळनेर : जळगांव जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अमळनेरच्या निवडणुका जानेवारी 2017 मध्ये संपन्न होत आहेत. त्या निवडणूक अमळनेर कॉग्रेसपक्ष तालुका पातळीवर स्वबळावर लढविण्याचा निर्णय काँग्रेस पक्षातर्फे घेण्यात आला आहे. सदर निवडणुकांसाठी अमळनेर तालुका काँग्रेस पक्षाची महत्वपूर्ण बैठक मंगळवार 13 डिसेंबर दुपारी 1 वाजता कै. नांदेडकर सभागृह कोर्टासमोर अमळनेर येथे आयोजित केली आहे. बैठकीत जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी इच्छुक उमेदवारांनी अर्जासह पक्ष बैठकीस उपस्थित राहावे. सदर बैठकीत इच्छुक उमेदवारांच्या गट व गण निहाय मुलाखती घेण्यात येऊन पक्षश्रेष्ठींनकडे अहवाल पाठविण्यात येणार आहे.म् हणून काँग्रेस पक्षाचे अमळनेर तालुक्यातील कार्यकर्ते-पदाधिकारी व पक्षप्रेमींनी सदर बैठकीस उपस्थिती द्यावी. असे आवाहन करण्यात आले. सदर बैठकीस पक्षाच्या जेष्ठ नेत्या अॅड. ललिता पाटील, जळगांव जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष अॅड. संदीप पाटील, प्रदेश चिटणीस डी.जी.पाटील, माजी नगराध्यक्ष विनोद पाटील आदि नेते उपस्थित राहून मार्गदर्शन करणार असल्याचे पत्रक अमळनेर तालुका काँग्रेस पक्षातर्फे काढण्यात आले आहे.