शहादा (प्रतिनिधी)
७ सप्टेंबर रोजी राष्ट्रवादीचे मंत्री ना. अनिल भाईदास पाटील व युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांच्या उपस्थितीत शहाद्यात कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला आहे. यासंदर्भात शहाद्यात राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर अभिजीत मोरे यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांची बैठक संपन्न झाली.
शासकीय विश्रामगृहात झालेल्या या बैठकील राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष डॉ. अभिजीत मोरे ,उपाध्यक्ष मोहन शेवाळे जिल्हा सरचिटणीस विष्णू जोंधळे जिल्हा सरचिटणीस मंगेश पवार युवा जिल्हाध्यक्ष सिताराम पावरा, उपाध्यक्ष छोटू कुवर, शहराध्यक्ष सुरेंद्र कुवर ,तालुकाध्यक्ष मधुकर पाटील ,राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्ष मंजूळाताई मुसळदे, सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष संजय खंदारे, महिला जिल्हाध्यक्ष अलका जोंधळे,डॉक्टर सेलचे जितेंद्र भंडारी
राजेंद्र वाघ,संतोष पराडके,महेंद्र कुंवर कमलेश चौधरी आदींसह कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते यावेळी जिल्हा सरचिटणीस विष्णू जोंधळे यांनी प्रास्ताविकातून मंत्री महोदय व युवा प्रदेशाध्यक्ष यांच्या दौऱ्यासंबंधी करावयाच्या तयारी बाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले.जिल्हा उपाध्यक्ष मोहन शेवाळे यांनी अजितदादा पवार यांच्या वाढत्या ताकदीने राष्ट्रवादी अधिक मजबूत होत असल्याचे स्पष्ट केले.या जिल्ह्याची निर्मितीच्या काळापासून एकनिष्ठ असल्याचे जिल्हा सरचिटणीस मंगेश पवार यांनी सांगितले. युवक अध्यक्ष सिताराम पावरा यांनी संघटन आणि अजित दादा यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत यापुढेही सातत्याने कार्यरत राहण्याचे आवाहन केले .अमिषांना बळी न पडता कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी पक्ष व आपसातील एकजूट कायम ठेवण्याचे आवाहन केले. जिल्हाध्यक्ष डॉक्टर अभिजीत मोरे यांनी उपमुख्यमंत्री म्हणून नामदार अजित दादा पवार यांनी खानदेश आणि नंदुरबार जिल्हा यांना नेहमीच झुकते माप दिल्याचा उल्लेख केला. नंदुरबार जिल्ह्यातील सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी व आजवर प्रलंबित राहिलेल्या प्रकल्पांना देखील प्राधान्य दिले आहे नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी दलित शोषित पीडित यांच्या कल्याणकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी अधिकाधिक संख्येने कार्यकर्त्यांनी पुढे यावे तसेच आपल्या परिसरातील लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांसोबत सातत्याने संपर्कात राहण्याचे देखील आवाहन केले.