आगामी वर्षात चोपडा शहराचा चेहरामोहरा बदलणार

0

चोपडा ( प्रतिनिधी )-शासनाच्या विविध योजनेच्या निधीतून नगरपरिषदेच्या माध्यमातून शहरात कोट्यवधीं रुपयांच्या विकासकामांचा धडाका सुरू असून, वैशिष्टपूर्ण योजने अंतर्गत ९० लाख रुपये खर्चा च्या अल्पसंख्यांक समाजासाठी आझाद चौकात बांधलेल्या सामाजिक सभागृहाचा लोकार्पण सोहळा राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री ना.जयंतराव पाटील यांच्या हस्ते उद्या दि.१२ फेब्रुवारी रोजी सकाळी ९:३० वाजता होत असल्याची माहिती नगराध्यक्षा मनीषा चौधरी यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
नगराध्यक्ष यांच्या दालनात गुरुवारी सकाळी १० वाजता आयोजित पत्रकार परिषदेत नगराध्यक्षा मनीषा चौधरी, उपनगराध्यक्ष भुपेंद्र गुजराथी,मुख्याधिकारी अविनाश गांगोडे, गटनेते जीवन चौधरी, नगरसेवक गजेंद्र जयस्वाल, रमेश शिंदे, अशोक बाविस्कर, हुसेनखा पठाण तसेच चेतन चौधरी आदी उपस्थित होते.
शहरवासियांना मिळणार रोज शुध्द पाणी
नगरपरिषदेच्या ६५ कोटी रुपये खर्चाच्या गुळ मध्यम प्रकल्पावरील पाणी पुरवठा योजनेचे काम गेल्या वर्षांपासून युद्ध पातळीवर सुरू असून,आज पर्यंत ६१ टक्के काम पूर्ण झाले आहे. शहरातील नागरिकांना लवकरच दररोज शुद्ध पिण्याचे पाणी मिळणार आहे. शासनाच्या वैशिष्टपूर्ण योजने अंतर्गत ९० लाख रुपये खर्चाच्या अल्पसंख्यांक समाजासाठी आझाद चौकात बांधलेल्या सामाजिक सभागृहाचे बांधकाम करण्यात आले आहे. शहरात रामपूरा भागात वैशिष्टपूर्ण योजनेत ६ कोटी रुपये खर्चून अद्यावत अशा स्मशानभूमीचे बांधकाम पूर्णत्वास येत आहे.नगरपरिषदेची समशनभूमीचे बांधकाम महाराष्ट्रात मॉडेल ठरणार आहे.विशेष रस्ता योजने अंतर्गत कस्तुरबा विद्यालय ते शिरपूर बायपास रोडसाठी ४ कोटी ३० लाख रुपये निधी मंजूर आहे.सदर कामाची निविदा प्रक्रिया राबविण्यात आली आहे. जिल्हा वार्षिक योजनेतून ६ कोटी रुपये निधी मंजूर असून, त्यात शहरातील रस्ते, गटारी आदी विकास होणार आहेत असल्याचे नगराध्यक्षा मनीषा चौधरी यांनी सांगितले.