आगीत घराचे नुकसान; पिडीत कुटुंबियांना विविध क्षेत्रातून मदत

0

वरखेडी। पाचोरा तालुक्यातील वरखेडी येथून जवळच असलेल्या भोजे गावात विज वितरण कंपनीचे अक्षम्य दुर्लक्षामुळे जीर्ण झालेले विजवाहक तार घरावर पडल्याने घराला आग लागली. ही घटना 22 एप्रिल रोजी घडली होती. यात तीन घरे जळाले होते. विधवा महिला लीलाबाई गुणवत उभाळे यांचे या घटनेत सगळ्यात जास्त नुकसान झाले.

लीलाबाई गुणवत उभाळे यांच्या घरी 5 मे रोजी त्यांचा मुलीचे लग्न आहे. सामाजिक कार्यकर्ते, राजकीय, व्यापारी, प्रतिष्ठीत शेतकरी यांनी मदतीचा हात पुठे केला आहे. आमदार किशोर पाटील यांनी अकरा हजार, माजी आमदार दिलीप वाघ पाच हजार, पिंपळगाव येथील डॉ.शांतीलाल तेली 11 यांनी हजार व 5 क्विटल गहू, तेल, जि.प.सदस्य मधुकर काटे यांनी पाच हजाराची मदत दिली आहे. पंचायत समिती उपसभापती अनिता पवार, दिपकसिंग राजपूत, उद्धव मराठे , दत्ता पाटील, सचिन सोमवंशी, संदीप महाजन, रविशंकर पांडे यांनी देखील मदतीचा हात पुढे केला आहे.