पुणे – भवानीपेठेतील लक्ष्मी बाजार येथे सोमवारी पहाटे साडेचारच्या सुमारास रस्त्यावर उभ्या असलेल्या एका टेम्पोला अचानक आग लागली. यावेळी टेम्पोत कोणीही नसल्याने जीवितहानी टळली. भवानीपेठेतील लक्ष्मीबाजार येथे टाटाचा एक टेम्पो उभा होता. पहाटे साडेचारच्या सुमारास टेम्पोला अचानक आग लागली. यावेळी टेम्पोत कोणीही नव्हते. स्थानिकांनी अग्निशामक दलाला याची माहिती दिली. दलाच्या जवानांनी तातडीने कारवाई करत आग आटोक्यात आणली.
या आगीत टेम्पोचे सीट जळून खाक झाले व काचा फुटून टेम्पोचे मोठे नुकसान झाले. समीर शेख, फायरमन तांदेल केदारे व मिळवणे यांनी आग आटोक्यात आणली.