आगीनंतर वीजपुरवठा सुरू न केल्याने एनगाव सबस्टेशनची तोडफोड

0

भुसावळ : बोदवड तालुक्यात घाणखेडे येथे शेतशिवारात आग लागल्यानंतर वीजपुरवठा सुरू करण्यासाठी एनगाव सबस्टेशन कर्मचार्‍यांना वारंवार विनंती करूनही त्यांनी वीजपुरवठा सुरू न केल्याने व समाधानकारक उत्तर न दिल्याने संतप्त जमावाने सबस्टेशनची तोडफोड करत वीज कर्मचार्‍यांना मारहाण केली.

संतप्त जमावाच्या हल्ल्यात सबस्टेशनमधील टेबल, खुर्चीचे नुकसान झाले तर खिडक्यांची तावदाणेही तुटली. घटनेची माहिती कळताच बोदवडचे पोलीस उपनिरीक्षक अंबादास पाथरवट दाखल झाले. वीज कंपनीच्या मारहाण झालेल्या कर्मचार्‍यांना तातडीने उपचारार्थ हलवण्यात आले. याप्रकरणी जमावाविरूध्द गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असल्याचे सुत्रांनी सांगितले.