आघाडीच्या काळात भारतात सर्रास बॉम्बस्फोट व्हायचे: मोदी

0

नाशिक: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे, भारती पवार यांच्या प्रचारासाठी नाशिक जिल्ह्यात आहे. नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव येथे त्यांची सभा सुरु आहे. यावेळी त्यांनी कॉंग्रेससह महाआघाडीवर टीका केली. आज दहशतवादी भारतावर हल्ले करायला घाबरत आहे. त्यांना माहित आहे. जर आपण हल्ले केले तर भारत घरात घुसून बदला घेतो. आघाडीच्या काळात भारतात सर्रास बॉम्बस्फोट व्हायचे असा हल्ला बोल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. मुंबई, दिल्ली, काशी, अयोध्येत आघाडीच्या काळात बॉम्बस्फोट होत होते असे मोदींनी यावेळी सांगितले. नाशिक आणि दिंडोरीमध्ये २९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी ते आज प्रचार घेत आहे.

पाच वर्षात देशातील जनतेसाठी भाजपने ठोस कामे केली आहे. आरोग्य, बांधकाम, शेतकऱ्यांसाठी मोठे काम केले आहे. गावागावात रस्ते, वीज, पोहोचावीत आहे. प्रत्येक गरिबांसाठी बँकेत खाते सुरु केले. बँकेचे दरवाजे, गरिबांसाठी खुले केले.

कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या विकासासाठी सरकार प्रयत्न करत आहे. कांदा साठवणुकीसाठी सरकार मदत करत आहे असे मोदींनी यावेळी सांगितले. कॉंग्रेसच्या काळात मोठ्या प्रमाणात दलालांचे हस्तक्षेप वाढले होते. भाजपने सत्तेत आल्यानंतर दलालांची दुकाने भाजपने बंद केली असे मोदींनी यावेळी सांगितले.