आघाडीच्या नेत्यांनी घेतली राज्यपालांची भेट !

0

मुंबई : राज्यात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान याच पार्श्वभूमीवर कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीच्या नेत्यांनी राज्यपाल भगतसिंह कोशारी यांची भेट घेतली. राज्यात नवीन सरकार स्थापन होईल तोपर्यंत शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्यावी अशी मागणी राज्यपालांकडे केली आहे. राज्याचे पालक म्हणून राज्यपालांनी शेतकऱ्यांना मदत द्यावे अशी मागणी आघाडीच्या नेत्यांनी केली आहे. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादीचे विधिमंडळ नेते अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, छगन भुजबळ, धनंजय मुंडे, शरद रणपिसे आदी यावेळी उपस्थित होते.

विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात सत्तासंघर्ष शिगेला पेटला आहे. जनतेने युतीच्या मतदान केले असले तरी जागावाटपावरून दोघांमध्ये विस्तव जात नाही आहे. पहिले अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद आणि गृहमंत्री पदासह महत्त्वाच्या खात्यांची मागणी शिवसेनेने केली आहे. तर गृहमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्र्यांच्या भेटीत ही मागणी फेटाळल्याचे सांगण्यात येत आहे. दुसरीकडे शिवसेनेची आघाडीच्या नेत्यांशी जवळीक वाढलेली दिसत आहे. शिवसेनेकडून अद्याप कोणत्या प्रकारचा प्रस्ताव आला नसल्याचे राष्ट्रवादीचे नेते सांगत आहेत. ते खुलेपणमाने हे मान्य करत नसले तरी आतल्या आत खूपकाही शिजत असल्याचे सांगण्यात येत आहे. यावरून देखील आघाडीच्या नेत्यांनी राज्यपालांची भेट घेतल्याने चर्चेला उधाण आले आहे.