आघाडीतील मित्रपक्ष शिवसेनेसोबत जाण्यास तयार: जयंत पाटील

0

मुंबई: सत्ता स्थापनेच्या दृष्टीने आजचा दिवस अधिक वेगवान आहे. महाशिवआघाडीचे सरकार बनणार हे आता जवळपास निश्चित झाले आहे. दरम्यान कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीत सत्ता स्थापनेसाठी तयार झालेल्या फॉर्म्युलाबाबतची माहिती देण्यासाठी मित्रपक्षांची बैठक बोलविली होती. धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी आघाडीची ही बैठक झाली. बैठकीनंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रसार माध्यमांना माहिती दिली. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेनेसोबत जाण्यास आघाडीच्या मित्रपक्षांनी संमिती दर्शविली आहे असे जयंत पाटील यांनी सांगितले.

मित्रपक्षांना विश्वासात घेतले असून आता शिवसेनेशी चर्चा केली जाईल त्यानंतर अंतिम निर्णय जाहीर केला जाही. लवकरच निर्णय जाहीर होईल असे जयंत पाटील यांनी यावेळी सांगितले.