आघाडीत मुख्यमंत्री सेनेचाच होईल; नवाब मलिक यांचे मोठे विधान

0

मुंबई: राज्यातील सत्ता संघर्ष संपले नसल्याने अखेर राज्यपालांनी राष्ट्रपती राजवट लागू केली. शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस पक्ष एकत्र येऊन महाशिवआघाडीचे सरकार येईल या दृष्टीने हालचाली सुरु आहे. त्या संबधी बैठकांचे सत्र देखील सुरु आहे. दरम्यान मुख्यमंत्री पदाबाबत राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी मोठे विधान केले आहे. मुख्यमंत्री पदासाठीच शिवसेनेने भाजपची फारकत घेतली असल्याने मुख्यमंत्री शिवसेनेचाच होईल, शिवसेनेचा मुख्यमंत्री करून आम्ही त्यांचा सन्मान करू असेही मलिक यांनी सांगितले.

शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. किमान समान कार्यक्रमावर चर्चा झाली असून तो तयार देखील झाला आहे. तो तिन्ही पक्षाच्या श्रेष्ठींकडे पाठविला जाणार आहे.