नंदुरबार । गोहत्या बंदी कायदा लागू असूनही नंदुरबार येथील धडगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात गो तस्करी चालू आहे. हे पोलिसांना का दिसत नाही ? की ते हप्ते घेतात असा सवाल उपस्थित करून,हिंदु धर्मावरील आघात रोखण्यासाठी हिंदूंनी संघटित होणे आवश्यक असल्याचे मत आमदार आणि गोरक्षक श्री. टी.राजासिंह यांनी केले. हिंदु जनजागृती समितीच्या हिंदु धर्मजागृती सभेत ते बोलत होते. यावेळी सनातन संस्थेचे प्रसारसेवक सद्गुरु नंदकुमार जाधव, हिंदु जनजागृती समितीच्या रागेश्री देशपांडे आणि रणरागिणी शाखेच्या क्षिप्रा जुवेकर या उपस्थित होत्या. या सभेला हजारो हिंदू धर्मप्रेमी उपस्थित होते.समितीच्या या कार्यामध्ये सहभागी होऊन युवकांनी संघटित व्हावे. इंग्रजांप्रमाणे आजही तोडा आणि फोडा ही नीती वापरून हिंदूंना विभागण्याचे काम चालू आहे. या कूटनीतीला बळी न पडता जागृत रहावे. अखंड हिंदु राष्ट्र निर्मितीच्या कार्यात सर्व युवकांनी सहभागी व्हावे, असे आवाहनही आमदार राजसिंह यांनी केले.
पद्मावतमध्ये इतिहासाची मोडतोड
इतिहासाची मोडतोड करून ‘पद्मावत’चित्रपट बनवण्यात आला आहे. यामध्ये ब्राह्मण आणि राजपूत यांच्यात द्वेषभाव निर्माण होण्यासारखी दृश्ये बनवण्यात आली आहेत. या चित्रपटावर सर्व हिंदुस्थानात बहिष्कार घालण्यात यावा, असे आवाहन आमदार टी.राजासिंह यांनी या वेळी केले.
नंदकुमार जाधवांनी मांडले विचार
मालेगांव बॉम्बस्फोट प्रकरणात साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर, कर्नल पुरोहित यांच्यासह 9 हिंदुत्वनिष्ठांना कोणताही पुरावा नसतांना अटक केली होती. त्यांना विनाकारण 9 वर्षे कारागृहात सडवले गेले. ते आज जामीनावर मुक्त झाले आहेत. अशाच प्रकारे अनेक संतांवरही खोटे आरोप ठेवून त्यांना कारागृहात डांबण्यात आले आहे. अशा प्रकारे हिंदुत्वनिष्ठांवर अन्याय्य कारवाई करणार्यावंर विद्यमान शासन कठोर कारवाई कधी करणार? असा सवाल नंदकुमार जाधव यांनी केला.
स्वसंरक्षण प्रशिक्षण घेणे काळाची गरज!
तरुणींनी अबला नव्हे,तर सबला बनून जिहादींचा सामना करून आपले शौर्य गाजवले पाहिजे;कारण धर्मांधांकडून‘लव्ह जिहाद’, ‘लॅण्ड जिहाद’, ‘फतवा जिहाद’, ‘फिल्म जिहाद’, यांसारखे 14 प्रकारचे जिहाद केले जात आहेत. नुकतेच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी राज्यातील 5 सहस्त्रांहून अधिक मुली या वर्षी बेपत्ता झाल्याची माहिती उघड केली आहे. या मुली नेमक्या गेल्या कुठे ? स्वतःचा आत्मसन्मान जपण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने चालू करण्यात येणार्या निःशुल्क स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गात प्रशिक्षण घ्यावे, असे मत क्षिप्रा जुवेकर यांनी सांगितले.