वरणगांव । प्रतिनिधी
माँ नर्मदा परिक्रमा करत असतांना आपला आचार हा धार्मिक असतो,विचार हे सात्विक असतात आणि मुखात मातेच्याच नामस्मरणाचे उच्चार असतात. त्यामुळे जवळपास तीन हजार 609 किलोमीटर पायी चालत असतांना मातेचं नामस्मरण करोडोच्या संख्येने होते. असे अनुभव कथन परिक्रमवासी डॉ. नितु पाटील यांनी आज जळगाव आयएमए हॉल याठिकाणी केले.
जळगाव आयएमए गणेशोत्सव 2023 च्या निमित्ताने नर्मदा माता परिक्रमा अनुभव कथन कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर जळगाव आयएमए चे अध्यक्ष डॉ.सुनील नाहाटा ,सचिव डॉ.तुषार बेंडाळे आदी हे उपस्थित होते. परिक्रमवासी डॉ. नितु पाटील यांचा सत्कार आयएमएचे अध्यक्ष डॉ. नाहाटा तसेच जळगाव नेत्र संघटना मार्फत डॉ. रागिणी पाटील यांच्या हस्ते देखील सत्कार झाला. पुढे डॉ. पाटील म्हणाले की परिक्रमा करत असतांना उच्चार फक्त नामस्मरणासाठी करावा असे विविध अनुभव डॉ नितु पाटील यांनी उदाहरण देवून सांगितले.तसेच आगामी काळात नर्मदा परिक्रमा अनुभवावर एक पुस्तक लिहिण्याचे काम माझे वर्गमित्र सुश्रुत जळूकर यांनी हाती घेतले असून लवकरच त्याचे प्रकाशन होईल.यावेळी जळगाव आयएमए पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ. तुषार बेंडाळे , तर आभार प्रदर्शन डॉ. भरत बोरोले यांनी केले.