शेंदुर्णी। येथे गरूड विद्यालयाची सभा गरूड पतसंस्था शेंदुर्णी येथे संपन्न झाली. या सभेचे अध्यक्ष संस्थेचे चेअरमन संजय गरूड हे होते. त्यांनी मनोगतामध्ये विद्यार्थी गुणवत्तावाढीसाठी विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करणे, योजना राबविणे, स्पर्धा परीक्षा तयारी करून घेणे आदी विषयांवर चर्चा करण्यात आली. प्रास्ताविक शाळेचे प्राचार्य बी.जी.मांडवडेसर यांनी केले.
प्रास्ताविकमध्ये नैदानिक चाचणी, ई- लर्निंग क्लास, शासकीय योजना याविषयी मार्गदर्शन केले. तसेच सोयगावचे नगराध्यक्ष योगेश पाटील यांनी संस्थेविषयी लेखाजोखा मांडला सर्व उपक्रम यशस्वीरित्या राबविले जातात. सूत्रसंचलन पी.जी.पाटील यांनी केले. कार्यकारणी सचिव एस. बी. पाटील यांनी मांडली. या सभेला उपसभापती सुधाकर बारी, दिलीप पाटील, सहसचिव भावना जैन, अनिल गुजर, हेमा काबरा, शितल काबरा, संध्या पाटील, शिवाजी पाटील, संजय पाटील, समाधान पारधी, नंदकिशोर बारी, गौरी बारी, सुधाकर बडगुजर, योगेश इखनकर आदी उपस्थित होते. आभार उपमुख्याध्यापक एस.डी.चव्हाण यांनी केले.