मुंबई: माजी मंत्री भाजपनेते एकनाथराव खडसे हे सातत्याने भाजपला लक्ष केले आहे. पक्षात ते नाराज आहे, त्यांनी अनेकवेळा आपली नाराजी जाहीरपणे उघड केली आहे. दरम्यान आज स्व.गोपीनाथराव मुंडे यांची जयंती आहे. गोपीनाथ गडावर खडसे जाणार आहे. तत्पूर्वी एका वृत्त वाहिनीशी बोलताना खडसे यांनी भाजप आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर अप्रत्यक्ष आरोप करत टोला लगावला.
स्व.गोपीनाथ मुंडे हे मोठ्या मनाचे होते. चुकले असेल तर त्याला चुकीची जाणीव करून देत सामावून घेत होते. पाठीत खंजीर खुपसणारे गोपीनाथ मुंडे नव्हते. द्वेष भावना त्यांनी कधीही ठेवली नव्हती, मात्र आजचे राज्याचे नेतृत्व हे कोत्या मनाचे आणि द्वेष भावना ठेवणारे आहे अशा टोकदार शब्दात खडसे यांनी भाजप आणि देवेंद्र फडणवीसांना लक्ष केले.
जाणीवपूर्वक द्वेष भावनेने आम्हाला दूर करण्याचा प्रयत्न केला गेला. तिकीट दिले गेले नाही, ज्यांना दिले गेले त्यांना पक्षांतर्गत कुरघोड्या करून पराभूत करण्यात आले असे सांगत त्यांनी भाजपला घरचा आहेर दिला.