मुंबई: राज्यात वंचित बहुजन आघाडीने आज महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. ‘सीएए, एनआरसीच्या मुद्द्यावर वंचित बहुजन आघाडीनं घेतलेली भूमिका लोकांपर्यंत पोहोचली असल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्यामुळे आजच्या महाराष्ट्र बंदला राज्यात चांगला प्रतिसाद मिळेल, असा दावा आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.
नागरिकत्व सुधारणा कायदा व राष्ट्रीय नागरिक नोंदणी व केंद्र सरकारच्या खासगीकरणाच्या धोरणाविरोधात ‘वंचित’नं आज महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. वंचितचे प्रभावक्षेत्र असलेल्या अकोल्यात बंदला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. अकोल्यातील मुख्य बाजारपेठ बंद आहे. मुंबई, औरंगाबाद व नाशिकमध्ये सकाळपासूनच ‘वंचित’चे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. औरंगाबादेत काही भागात व्यापाऱ्यांनी दुकानं बंद ठेवणंच पसंत केलं आहे. तर, मुंबईत अनेक ठिकाणी रास्ता रोको सुरू आहेत.